घरताज्या घडामोडीRajasthan Political Crisis : त्या वक्तव्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले

Rajasthan Political Crisis : त्या वक्तव्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले

Subscribe

विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यावरून आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक विधान राजभवनासंदर्भात एक विधान केले होते. त्या विधानावरून राज्यपाल कलराज मिश्र यांनी गेहलोत यांना पत्र लिहून फटकारले आहे.


राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पाठिंबा देणारे आमदार राजभवनातून निघाले असून ते शनिवारी त्यांचे निषेध आंदोलन सुरू ठेवणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

https://twitter.com/ANI/status/1286668702243381248


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मला खात्री आहे की राज्यपाल कोणत्याही दबावाखाली येणार नाहीत, ते योग्य निर्णय घेतील. आम्ही आशा करतो की विधानसभा अधिवेशन लवकरच सुरू होईल. म्हणून आम्ही येथे निषेध करत बसलो आहोत. त्यांनी आम्हाला पत्र दिल्यानंतर आम्ही पुढील कारवाईचा निर्णय घेऊ.

- Advertisement -


राजभवनामध्ये सर्व आमदार घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री गेहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेत आहेत. आमदार आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देत आहेत.


राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यात आता दोन वाजता बैठक होणार आहे. दरम्यान, विधानसभेचं अधिवेशन बोलावायचं आहे, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे, असं अशोक गेहलोत यांनी सांगितलं. कोरोनाचे संकट असल्यास ते सर्व आमदारांची कोरोना चाचणी करण्यास तयार आहेत, राजस्थानचे मंत्री रघु शर्मा म्हणाले.


उच्च न्यायालयाच्या स्टेनंतर राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून गेहलोत राज्यपालांना भेटायला जाणार आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने सभापतींच्या कारवाईवर स्थगिती आणली.


सचिन पायलट गटाला राजस्थान हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या नोटीसवर नुकतीच स्थगिती आली आहे, म्हणजेच विधानसभा अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरविण्यास सक्षम राहणार नाहीत. परंतु, अन्य बाबींबाबत उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू आहे.


उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली आहे. सर्व बाजूंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोक सामील झाले आहेत. केंद्राला पक्षकार बनवण्याची याचिका मान्य केली आहे.


राजस्थानच्या सभापतींनी याचिका दाखल केली आहे की, सचिन पायलट गटाने केंद्राला पक्षकार म्हणून केलेली अपील चुकीची आहे. अशा वेळी हे अपील फेटाळून लावावे.


राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट गटाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -