घरताज्या घडामोडीपाकिस्तानमधून जोधपूरमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू

पाकिस्तानमधून जोधपूरमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू

Subscribe

राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पाकिस्तानमधून शरणार्थी म्हणून आलेल्या एका हिंदू कुटुंबातील ११ जणांचा मृतदेह रविवारी सकाळी शेतात आढळून आला. हे सर्व लोक देचू नामक गावात एका झोपडीत राहत होते. २०१५ साली हे कुटुंब पाकिस्तानातून भारतात आले होते. इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार कुटुंबातील ७५ वर्षीय बुधारामची मुलगी लक्ष्मी (वय ३८) हीने इंजेक्शन देऊन सर्वांना मारले. पोलिसांना झोपडीतून विषाच्या बाटल्या आणि इंजेक्शन सापडले आहेत. तसेच अल्प्राजोलमच्या (झोपेच्या) गोळ्या देखील मिळाल्या आहेत. १२ जणांच्या या कुटुंबात केवळ एक व्यक्ती जिवंत राहिला आहे.

लक्ष्मी हीने पाकिस्तानात असताना नर्सचे प्रशिक्षण घेतले होते, असे सांगितले जात आहे. पोलिसांना येथे एक सुसाइड नोट देखील मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मृतांना जेवणातून झोपेच्या गोळ्या दिल्या असाव्यात आणि त्यानंतर त्यांना विषाचे इंजेक्शन दिले असावे. या कुटुंबात तीन महिला, दोन पुरुष आणि पाच मुलांच्या हातावर इंजेक्शन दिल्याचे निशाण दिसत आहे. तर लक्ष्मीच्या पायावर इंजेक्शन टोचल्याचे निशाण दिसत आहे. लक्ष्मीने आधी दहा जणांना हातावर इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः पायावर इंजेक्शन घेतले, असा कयास लावला जात आहे. मात्र अजूनही तपास सुरु असून त्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल.

- Advertisement -

११ जणांच्या मृत्यूनंतर राजस्थानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपासातून सत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगितले जाते की, या कुटुंबात अनेक दिवस कलह सुरु होता. लक्ष्मीचे लग्न झालेले असून तिचे सासर जोधपूर येथे आहे. मात्र ती सासरी जातच नव्हती. कुटुंबातील १२ वा सदस्य राम वाचला. कारण जेवणानंतर तो नीलगाय घेऊन शेतात गेला होता, तिथेच तो झोपला.

राजस्थान सरकारने सर्व ११ लोकांचे शवविच्छेदन मेडिकल बोर्ड जोधपूर येथे करण्याचे ठरविले आहे. या सर्वांचा मृत्यू जरी कुटुंब कलहातून झाला असला तरी त्यांच्या कलहाचे कारण गरीबी होते. काही दिवसांपासून हे कुटुंब जादूटोणा, तंत्र-मंत्र या सारख्या अंधश्रद्धेच्या कर्मकाडांत फसले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -