घरदेश-विदेशराजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवर भाजप मंत्र्याने केली लघुशंका

राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरवर भाजप मंत्र्याने केली लघुशंका

Subscribe

राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या पोस्टरवर त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री शंभूसिंह खेतासार हे लघुशंका करतानाचा फोटो सोशल व्हायरल झाला आहे.

राजस्थानच्या मंत्रीमंडळात असलेल्या मंत्र्याने केलेला अत्यंत किळसवाणा प्रकार सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या पोस्टरवर त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री शंभूसिंह खेतासार हे लघुशंका करतानाचा फोटो सोशल व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. अजमेरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या रॅलीदरम्यान त्यांनी हे किळसवाणे कृत्य केले आहे. शंभूसिंह राजस्थान राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पोस्टरवर लघुशंका करूनही स्वतःचा बचाव केला. उघड्यावर लघुशंका करणे ही जुनीच परंपरा आहे, त्यामुळे चालयचच अशी प्रतिक्रिया दिली. उघड्यावर लघुशंका केल्याने अस्वच्छता होत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

- Advertisement -

भाजपच्याच मंत्र्याचा स्वच्छ भारत अभियानाला हरताळ

स्वच्छ भारत मिशन योजनेतर्गंत राजस्थानमधील ३३ पैकी २७ जिल्हे हगणदारीमुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहेत. भाजपच्या पोस्टरवर लघुशंका केली नाही, तर थोड्या अंतरावर केली आणि मी त्या ठिकाणी असलेल्या पोस्टरकडे लक्ष दिले नाही, असेही स्वतःचा बचाव करताना शंभूसिंह म्हणाले. जवळपास किलोमीटर परिसरात कुठेच लघुशंकेसाठी जागा नव्हती, असा दावाही त्यांनी केला. आपल्या कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मोहिमेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. खातेसर यांनी ज्या ठिकाणी लघुशंका केली, त्याठिकाणी भाजपाची निवडणूक रॅली सुरू होती. साधारण २ लाख लोकं या रॅलीमध्ये उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -