Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी लग्न उरका ३१ वर्‍हाडी अन् ३ तासांत, अन्यथा १ लाखांच्या भुर्दंडाची अट...

लग्न उरका ३१ वर्‍हाडी अन् ३ तासांत, अन्यथा १ लाखांच्या भुर्दंडाची अट चर्चेत

Related Story

- Advertisement -

देशात कोरोना प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान राजस्थान सरकार आज लग्न सोहळ्यासंदर्भात कडक गाईडलाईन जारी केल्या आहेत आहे. लग्न सोहळ्याला फक्त ३१ नातेवाईकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तर ३ तासांत लग्न सोहळा उरकण्यास सांगितले आहे. तसेच जर या गाईडलाईनचे पालन केले गेले नाहीतर मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जाणार आहे.

राजस्थानच्या गृह विभागाने आज कोरोनाबाधितांमध्ये अभुतपूर्व वाढ झाल्याची घोषणा केली. आज राजस्थान १७ हजार २९६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान नव्या गाईडलाईनुसार जर ३१ पेक्षा जास्त लोकं लग्नाला उपस्थित राहिले आणि ३ तासांत लग्न झाले नाही तर आयोजकांकडून (हॉल मालक) १ लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

- Advertisement -

तसेच प्रशासनाला आधी माहिती न देता लग्नसोहळा आयोजित करण्यासाठी आणि हेल्थ प्रोटोकॉल न पाळल्याबद्दल ५००० रुपये दंड आकारण्यात येईल, असे या गाईडलाईनमध्ये नमूद केले आहे.

कोणत्याही व्यक्तीने लग्नासाठी एकापेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करायचे असेल तर गाईडलाईननुसार तो/तिने संबंधित उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम)कडे ई-मेलद्वारे प्राधान्याने लेखी माहिती सादर करावी. या महितीमध्ये उपस्थितांची माहिती, तारीख आणि ठिकाण असणे आवश्यक आहे. तसेच या लग्न सोहळ्यांमध्ये प्रोटोकॉलनुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्क घाणे, स्क्रिनिंग आणि सॅनिटायझेशन करणे बंधनकारक आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Corona Update : केंद्राकडून दिलासा! परदेशातून येणाऱ्या कोरोना संबंधित मदतीवर IGST मधून सूट


 

- Advertisement -