घरताज्या घडामोडीधक्कादायक! महिला गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टरही संभ्रमात!

धक्कादायक! महिला गेल्या ५ महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टरही संभ्रमात!

Subscribe

एका ३० वर्षीय महिलेचा अहवाल गेल्या पाच महिन्यांपासून पॉझिटिव्ह येत असल्याचे समोर आले असून महिलेची तब्बल ३० वेळा टेस्टही करण्यात आली आहे. यामुळे आता डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत.

सामान्यत: कोरोनाव्हायरसचा संसर्ग हा १४ दिवसात पूर्ण होतो. मात्र, राजस्थानमधील भरतपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला तब्बल पाच महिन्यांपासून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत. आश्रमात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेचा अहवाल गेल्या पाच महिन्यांपासून पॉझिटिव्ह येत असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे या महिलेची तब्बल ३० वेळा टेस्टही करण्यात आली आहे. यामुळे आता डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत.

याचा दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग नाही

ज्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे, त्या महिलेचे वजन देखील आठ किलोने वाढल्याचे समोर आले आहे. मात्र, ही महिला फीट असून ती स्वत:ची कामे स्वत: करत आहे. याबाबत जयपुर येथील मानसिंह रुग्णालयातील माइक्रोबायोलॉजी डॉक्टरांनी सांगितले की, ‘कोरोनाची लागण झालेली महिला पॉझिटिव्ह असली तरी देखील तिच्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण होणार नाही. कारण त्या महिलेच्या शरीरात असलेले कोरोनाचे विषाणू Active नाहीत. त्यामुळे तिचा कोणालाही संसर्ग होऊ शकणार नाही. मात्र, असे असेल तरी त्या महिलेला आइसोलेशनमध्ये ठेवणे फार गरजेचे आहे’.

- Advertisement -

रोगप्रतिकारशक्ती कमी असणे ठरते घातक

डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे ‘कोरोना व्हायरस शरीरातून न जाण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे त्या महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे. तर दुसरे कारण म्हणजे त्या महिलेच्या नाकात कोरोना विषाणू थांबला असावा. यामुळे त्या महिलेचे नाक कमजोर झाले आहे. यामुळे त्या महिलेच्या शरीरातून कोरोना विषाणू जात नाही’.

पाच महिने आइसोलेशनमध्ये जेलबंद

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार; ‘या महिलेला २८ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. ती आश्रमातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती होती. तिला बझेरा गावातून आणले होते. मात्र, त्या महिलेवर अनेक उपचार करुनही ती महिला अद्याप कोरोनामुक्त झालेली नाही. त्यामुळे तिला पाच महिने आइसोलेशनमध्ये जेरबंद व्हावे लागत आहे’.

- Advertisement -

हेही वाचा – फेसबुक वापरकर्त्यांनो सावधान; ५.६२ लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -