घरदेश-विदेशनोटाबंदीची अंमलबजावणी चूक - रजनीकांत

नोटाबंदीची अंमलबजावणी चूक – रजनीकांत

Subscribe

रजनीकांत प्रो- मोदी असल्याचे मानले जाते. त्यांनी कधीच मोदीच्या विरोधात वक्तव्य केले नाही. असे असताना आता रजनीकांत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा होत आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांनी भाजपसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. अन्य पक्षांना भाजपा धोकादायक पक्ष वाटत असेल तर तसे असेलही असे मत रजनीकांत यांनी आज व्यक्त केले. चेन्नई विमानतळाबाहेर पत्रकारांशी बोलताना रजनिकांत यांनी हे वक्तव्य केले आहे. त्याचसोबत दोन वर्षापूर्वी भाजपने केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयासंदर्भातही त्यांनी वक्तव्य केले आहे. आधी योग्य रिसर्च करुन नंतर अंमलबजावणीचा निर्णय घ्यायला हवा होता, असे मत रजनीकांत यांनी व्यक्त केले आहे.

नोटाबंदीची अंमलबजावणी चूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षापूर्वी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे रजनीकांत यांनी कौतुक केले होते. मात्र आता रजनीकांत यांनी भाजपच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. भाजपने योग्य रिसर्च करुन नंतरच नोटाबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला हवी होती असे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

बनवला आहे फॅन क्लब

याआधी रजनीकांत यांनी आपला फॅन क्लब बनवला आहे. ज्याचे नाव त्यांनी रजनी मक्कल मंद्रम असे ठेवले आहे. आता रजनिकांत यांच्या फॅन्सला अपेक्षा आहे की, १२ डिसेंबरला म्हणजे रजनीकांत त्यांच्या जन्मदिवशी औपचारिक रुपाने थलाइवा या राजकिय पार्टीची घोषणा करावी.

भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा

गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे की, रजनीकांत भाजपमधील जातील. अनेकदा त्यांनी मोदी सरकारच्या कामांचे कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या राजकीय महत्वकांक्षा गेल्या अनेक वर्षापासून अनेकदा उघड करुन सांगितल्या आहेत. रजनीकांत प्रो- मोदी असल्याचे मानले जाते. त्यांनी कधीच मोदीच्या विरोधात वक्तव्य केले नाही. दयानंद सरस्वती सारख्या आध्यात्मिक नेताने अनेकदा रजनीकांत यांना भाजपसोबत काम करण्यास सांगितले होते.

- Advertisement -

गेल्यावर्षी राजकीय मैदानात उतरले

रजनिकांत यांनी गेल्या अनेक वर्षापासून हो- नाही करत अखेर मागच्या वर्षी राजकारणात उतरत असल्याची घोषणा केली होती. तामिळनाडूच्या राजकारणात रजनिकांत यांनी अशा वेळी इन्ट्री केली होती. जेव्हा जयललिता यांच्या निधनानंतर राज्यामध्ये राजकिय वाद सुरु होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -