चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्याच्या प्रदर्शित झालेल्या जेलर चित्रपटाबरोबरच त्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट घेऊन त्यांचे दर्शन घेतल्यामुळेही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र रजनिकांतने त्याच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीचे पाय पकडणे कितपत योग्य आहे म्हणत यावर चांगलाच वाद झाला होता. दरम्यान या झालेल्या वादावर आता स्वतः रजनिकांत यांनी मौन सोडले असून, त्यांनी आपण योगी आदित्यनाथ यांचे दर्शन का घेतले याबाबत खुलासा केला आहे. (Rajinikanth breaks silence after controversy over Yogi Adityanaths footfall Said I every)
झालेल्या या वादानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनी सांगितले की, कोणत्याही सन्यासी व्यक्तीच्या पाया पडणे, त्यांचे दर्शन घेणे हा त्यांचा स्वभाव असून, त्यामुळेच आपण योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडलो, मग तो सन्यासी व्यक्ती त्यांच्यापेक्षा वयाने लहान असो की मग मोठा असे मला त्याचा काही फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : Chandrayaan-3 : मिशन वेळापत्रकानुसार; ISRO ने व्हिडीओ ट्वीट करत दिली माहिती
यामुळे झाला होता वाद
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनी त्यांच्या जेलर चित्रपटाच्या यशानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. तेव्हा ते योगी आदित्यनाथ यांच्या पाया पडले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशासह विशेष करून तामिळनाडूमध्ये चांगलाच वाद झाला होता. 72 वर्षीय रजनीकांत यांनी त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीच्या पाया पडणे कितपत योग्य आहे म्हणत प्रश्न उपस्थित केले होते. विशेष म्हणजे रजनीकांत यांचे वय पाहता उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पाया पडले असते तरी चालले असते असे म्हणाले होती. या सगळ्या विवादानंतर सुपरस्टार रजनीकांत यांनी यावर उत्तर दिले आहे.
हेही वाचा : प्रायोजित ‘पंचतारांकित पार्ट्या’मध्ये डॉक्टर सहभागी झाल्यास होणार कारवाई; NMC घातली बंदी
योगी आदित्यनाथ यांनी केले रजनीकांत यांचे कौतूक
रजनीकांत त्यांच्या ‘जेलर’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी लखनऊला पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी रजनीकांत यांच्या अभिनय कौशल्याचे कौतूक केले. मलाही ‘जेलर’ नावाचा चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मी रजनीकांतचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि तो इतका प्रतिभावान अभिनेता आहे की चित्रपटात फारसा आशय नसला तरी तो त्याच्या अभिनयाने तो उंचावतो असेही ते म्हणाले.