घरदेश-विदेशRajinikanth : आता काहीही बोलणे भीतीदायक, रजनीकांत निवडणुकीबाबत स्पष्टच म्हणाले...

Rajinikanth : आता काहीही बोलणे भीतीदायक, रजनीकांत निवडणुकीबाबत स्पष्टच म्हणाले…

Subscribe

सुपरस्टार रजनीकांत यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमात निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

चेन्नई : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे देशभरात आता आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे आता निवडणुका असो किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही विधाने अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येत आहेत. पण निवडणुरकांमध्ये अनेकांना राजकारणात रस येतो. काही अभिनेते किंवा अभिनेत्री तर अशाही आहेत, ज्यांनी अधिकृतरित्या राजकारणातही प्रवेश केला आहे. परंतु, दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी निवडणुकीबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे जोरदार चर्चा होऊ लागली आहे. (Rajinikanth expressed his clear opinion about the election)

हेही वाचा… Arvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेविरोधात आज देशभरात निदर्शने; INDIA आघाडीही एकजूट

- Advertisement -

सुपरस्टार रजनीकांत हे तमिळनाडूमधील चेन्नई याठिकाणी एका रुग्णालयाच्या शाखेच्या उद्घाटनासाठी गेले होते. यावेळी त्यांना कार्यक्रमात दोन शब्द बोलण्यास सांगितले. पण त्यांनी निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या कार्यक्रमात ते म्हणाले की, त्यांना फार काही बोलायचं नाहीये, कारण ही निवडणुकांची वेळ आहे. निवडणुकांच्या वेळी श्वास घ्यायलाही भीती वाटते. रजनीकांत यांनी असे म्हणताच कार्यक्रमातील लोक हसायला लागले. तर, देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असताना काही बोलणे भीतीदायक असल्याची भावनाही त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.

तसेच, मला अजिबात बोलायचे नाही. मात्र मला दोन शब्द बोलण्यास सांगितले गेले आहे. मी त्यांना विचारले की कार्यक्रमात मीडियासुद्धा असेल का? त्यावर ते म्हणाले की काही असतील. आता मला या कॅमेऱ्यांकडे पाहून भीती वाटतेय. ही निवडणुकांची वेळ आहे. त्यामुळे मला श्वास घ्यायलाही भीती वाटते, त्यांच्या या विधानानंतर आता सर्वत्र याची चर्चा सुरू झाली असून त्यांच्या या विधानाला अनेकांनी संमती दर्शवली आहे. तर, “आधी जेव्हा विचारले जायचे की कावेरी रुग्णालय कुठे आहे, तर लोक म्हणायचे की कमल हासन यांच्या घराजवळ आहे. आता जेव्हा विचारले जाते की कमल हासन यांचे घर कुठे आहे तर लोक म्हणतात की कावेरी रुग्णालयाजवळ आहे. हे मी सहजच म्हणतोय. मी मीडियाला विनंती करतो की त्यांनी यावरून असे लिहू नये की रजनीकांत यांनी कमल हासन यांच्यावर टीका केली.” त्यांच्या या विधानानंतरही उपस्थित लोक हसायला लागले.

- Advertisement -

या कार्यक्रमात रजनीकांत यांनी त्यांच्या सर्जरीचाही उल्लेख केला. कावेरी रुग्णालयातच त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यावेळी डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांची कशाप्रकारे काळजी घेतली, याविषयी त्यांनी सांगितले. 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर अनेकदा तमिळनाडूमधील विविध रुग्णालयांमध्ये आरोग्याच्या समस्यांवरून उपचार झाले. त्यामुळे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतल्याबद्दल त्यांनी यावेळी डॉक्टर आणि नर्सेस यांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -