घरदेश-विदेशदेवाचा इशारा...रजनीकांत काढणार नाहीत राजकीय पक्ष

देवाचा इशारा…रजनीकांत काढणार नाहीत राजकीय पक्ष

Subscribe

लवकरच राजकीय पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी केली होती. मात्र, त्यांनी आपला हा निर्णय मागे घेतला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे आपण राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, असे तीन पानांचे पत्र रजनीकांत यांनी ट्विट केले आहे. बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता, असे सांगत पक्ष स्थापन करणार नसल्याबद्दल रजनीकांत यांनी आपल्या फॅन्सची माफीही मागितली आहे.

रजनीकांत यांनी डिसेंबर 2017 मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र, लोकसभा ऩिवडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यावरही पडदा पडला आहे.

- Advertisement -

रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष सुरू करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता, असे म्हटले आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झाल्याचे वाटू नय, असे सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे. रजनीकांत यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि 2021 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे.

रजनीकांत यांना नुकतेच प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. 27 डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -