Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रजनीकांत निवृत्ती घेणार? प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांचे 'ते' वक्तव्य चर्चेत

रजनीकांत निवृत्ती घेणार? प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Subscribe

थलायवा म्हणून ओळख असलेले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी जगभरातील सर्व चाहत्यांच्या मानावर अधिराज्य गाजवलं आहे. रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर चाहत्यांची चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते. अनेकदा चाहत्यांनी रजनीकांत यांना आपले देव मानत त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला आहे.

थलायवा म्हणून ओळख असलेले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांनी जगभरातील सर्व चाहत्यांच्या मानावर अधिराज्य गाजवलं आहे. रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर चाहत्यांची चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी जमलेली पाहायला मिळते. अनेकदा चाहत्यांनी रजनीकांत यांना आपले देव मानत त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला आहे. मात्र आता रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या बातमीमुळे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज होऊ शकतात. कारण ‘Thalaivar 171’ हा चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. याबाबच सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (rajinikanth will retire from films this south director made a shocking disclosure fans are disappointed)

‘Thalaivar 171’ हा चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा चित्रपट ठरणार आहे. रजनीकांत यानंतर चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. लोकेश कनगराजबरोबर काम केलेला अभिनेता आणि तमीळ दिग्दर्शक मिस्किन यांच्या एका वक्तव्यामुळे ही चर्चा होत आहे. एका मुलाखतीमध्ये लोकेशविषयी बोलताना मिस्किन म्हणाले की, “लोकेश एक जबरदस्त फिल्ममेकर आहे. देशभरात त्याची चर्चा आहे. तो त्याचा आगामी चित्रपट रंजीनकांतबरोबर करत आहे. अशी चर्चा आहे की, हा चित्रपट रजनीकांत यांचा शेवटचा असेल, यात किती तथ्य आहे ते मला माहीत नाही. पण आज ५० वर्षे या क्षेत्रात काम केलेला एक सुपरस्टार लोकेशसह चित्रपट करायची इच्छा व्यक्त करतो ही लोकेशसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे”.

- Advertisement -

मात्र, रजनिकांत यांनी अद्याप स्वतः किंवा त्यांच्या जवळच्या लोकांपैकी कुणीच या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. रजनीकांत यांना लोकेश कनगराजच्या चित्रपटात पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांनी जगभरात त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूडमध्येही त्यांनी यश मिळवले. रजनीकांत यांच्या अभिनयात अशी जादू आहे की, चाहत्यांनी त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. वयाच्या ७२ व्या वर्षीही रजनीकांत नव्या कलाकारांना टक्कर देताना दिसतात.

- Advertisement -

लवकरच रजनीकांत दिग्दर्शक लोकेश कनगराजबरोबर ‘Thalaivar 171’ या चित्रपटात काम करणार आहेत. अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा १६९ वा चित्रपट आहे. त्यानंतर रजनीकांत हे आपल्या मुलीच्या ‘लाल सलाम’ या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत, हा चित्रपट त्यांचा १७० वा चित्रपट ठरणार आहे.

रजनीकांत लोकेश कनगराजच्या आगामी ‘Thalaivar 171’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा आहे. याआधीसुद्धा रजनीकांत आणि लोकेश यांनी एकत्र चित्रपट करायचा प्रयत्न केला होता, पण तो योग काही जुळून येत नव्हता. सध्या लोकेश हे त्यांच्या थलपती विजयसह ‘लिओ’ या चित्रपटावर काम करत आहेत. याचे काम पूर्ण झाल्यावर लोकेश रजनीकांत यांच्याबरोबर आगामी चित्रपटावर काम करणार आहेत. लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणादेखील होऊ शकते.


हेही वाचा – गौरवास्पद : भारतीय वंशाची ‘ही’ महिला न्यूयॉर्क पोलीस दलात कॅप्टनपदी नियुक्त

- Advertisment -