घरताज्या घडामोडीRajiv Gandhi: तर राजीव गांधींवर श्रीपेरुंबदुरमध्ये नाही दिल्लीत हल्ला झाला असता, LTTEचा...

Rajiv Gandhi: तर राजीव गांधींवर श्रीपेरुंबदुरमध्ये नाही दिल्लीत हल्ला झाला असता, LTTEचा प्लॅन बी

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज ३१ वी पुण्यतिथी आहे. २१ मे १९९१ रोजी एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. राजीव गांधी यांची एका निवडणूक रॅलीत हत्या झाली. त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला. २१ मे १९९१ हा दिवस आजही संपूर्ण देशासाठी मोठ्या धक्कादायक घटनेची आठवण करून देतो. कारण याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर ऑफ तमिळ इलम या संघटनेने हत्या घडवून आणली. हारात बॉम्ब ठेवून तसेच स्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली. राजीव गांधींच्या याच हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने आरोपी ए.जी पेरारिवलनच्या सुटकेचा आदेश दिला आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषींपैकी एक ए. जी. पेरारिवलनच्या सुटकेचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पेरारिवलनची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर नलिनी श्रीहरन, मरुगन आणि एका श्रीलंकन नागरिकासह या प्रकरणातील अन्य सहा दोषींच्या सुटकेची आशाही पल्लवित झाली आहे.

- Advertisement -

याआधीच्या सुनावणीत केंद्र सरकारने राजीव गांधी हत्येप्रकरणी ३० वर्षांपेक्षा जास्त काळ शिक्षा भोगत असलेल्या ए. जी. पेरारिवलन यांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवण्याच्या तामिळनाडूच्या राज्यपालांच्या निर्णयाचा बचाव केला होता. न्यायालयात अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) के. एम. नटराज यांनी न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांनी सांगितले की, केंद्रीय कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीची शिक्षा, माफी आणि दया याचिकेवर केवळ राष्ट्रपतीच निर्णय घेऊ शकतात.

आतापर्यंत राजीव गांधी हत्याकांड प्रकरणी एकूण २६ जणांना दोषी ठरवून मृत्यूदंड ठोठावण्यात आला आहे होता पण १९९९ साली त्यातील १९ जणांना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. राजीव गांधी हत्येप्रकरणी आता सात जणांना दोषी ठरवण्यात आले होते. सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती जन्मठेपेत बदलली. त्यानंतरही दिलासा न मिळाल्याने दोषींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

- Advertisement -

हत्या नेमकी का झाली?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ ला तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे हत्या करण्यात आली. या स्फोटामध्ये राजीव गांधी यांच्यासोबत १६ लोकांचा मृत्यू झाला आणि ४५ लोक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतील LTTE या दहशतवादी संघटनेने राजीव यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली होती. दरम्यान श्रीलंकेत तामिळ अपसंख्याक आणि सिंहली यांच्यात भाषिक वाद निर्माण झाला. या वादात तामिळ लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. या सिंहली लोकांच्या सरकारी आणि लष्करी अन्यायाला प्रत्युत्तर म्हणून प्रभाकरनच्या नेतृत्त्वाखाली लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या संघटनेची १९८० मध्ये स्थापन झाली. ही एक प्रकारे बंडखोर भूमिकेची संघटना होती.

भारतात आणि विशेषता तामिळनाडूत श्रीलंकेतील या भाषिक वादाकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहिले जात होते. याचदरम्यान श्रीलंकन लष्करातील काही सैनिकांची हत्या झाली, आणि या हत्येचा सूड म्हणून श्रीलंकेतील तमिळ लोकांचा नरसंहार घडवून आणला गेला.

यावेळी भारत श्रीलंकेवरील परिस्थितीकडे लक्ष ठेवून होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनाही देशात शांतता नांदावी अशी इच्छा होती. त्यामुळे २९ जुलै १९८७ रोजी श्रीलंका भारतात एक करार झाला. हा करार भारत-श्रीलंका करार किंवा राजीव गांधी-जयवर्धने करार या नावाने ओळखला जातो. या करारांतर्गत भारताने श्रीलंकेत शांतता नांदावी यासाठी शांतीसेना पाठवायचा निर्णय घेण्यात आला. आणि याच निर्णयामुळे पुढे राजीव गांधींच्या यांची हत्या झाली.

भारतीय शांतीसेना तामिळ वंशाच्या लोकांविरोधात लढत होती. यामध्ये दोन्हीकडून नुकसान भारताचे होत होते. कारण एकाबाजूने श्रीलंकेतील तामिळ लोकांमध्ये भारतद्वेष निर्माण झाला होता आणि दुसरीकडे भारतीय जवानांची हत्याही होत होती.

या हत्याकांडातील मुख्य आरोपी पेरारिवलन ३१ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगत होता. अटक झाली तेव्हा तो १९ वर्षांचा होता. पेरारिवलननेच आत्मघाती बॉम्बस्फोटासाठी वापरलेल्या दोन ९ व्होल्ट बॅटरी विकत घेतल्या आणि त्या मास्टरमाइंड शिवरासनला दिल्या. पेरारिवलन याला टाडा न्यायालयाची सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर २०१४ मध्ये फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली. तामिळनाडू सरकारच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी मार्चमध्ये पेरारिवलन यांना जामीन मंजूर केला होता. मात्र केंद्र सरकारने त्यांच्या याचिकेला विरोध केला. तमिळनाडूच्या राज्यपालांनी हे प्रकरण राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे पाठवले असून त्यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.

गेल्या ३० वर्षांहून अधिक काय राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी सुरु आहे. आजवर यातील अनेक आरोपींना अटक करण्यात आली. मात्र मुख्य आरोपीच्या जामीनामुळे आता इतर आरोपींनाही जामीनासाठी संधी मिळणार असल्याचे वाटू लागले आहे.


हेही वाचा : Good News : मोदी सरकारचा मोठा दिलासा! पेट्रोल ९.५० पैसे, डिझेल लीटरमागे ७ रु. होणार स्वस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -