घरताज्या घडामोडीRajiv Gandhi : राजीव गांधी हत्येतील तीनही आरोपी श्रीलंकेत परतले; दोन वर्षांपूर्वीच...

Rajiv Gandhi : राजीव गांधी हत्येतील तीनही आरोपी श्रीलंकेत परतले; दोन वर्षांपूर्वीच झाली सुटका

Subscribe

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सुटका झालेले तीन दोषी बुधवारी श्रीलंकेत परतल्याची माहिती समोर येत आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींची 2022 मध्ये सुटका करण्यात आली होती. यापैकी मुरुगन उर्फ श्रीहरन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस हे तिघे श्रीलंकेत परतले आहेत.

श्रीलंका : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सुटका झालेले तीन दोषी बुधवारी श्रीलंकेत परतल्याची माहिती समोर येत आहेत. राजीव गांधी यांच्या हत्येतील सहा दोषींची 2022 मध्ये सुटका करण्यात आली होती. यापैकी मुरुगन उर्फ श्रीहरन, जयकुमार आणि रॉबर्ट पायस हे तिघे श्रीलंकेत परतले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना तिरुचिरापल्ली येथील विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. (Rajiv Gandhi All three accused in Rajiv Gandhi assassination returned to Sri Lanka He was released two years ago)

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी हत्येप्रकरणी या तीन दोषींची दोन वर्षांपूर्वी सुटका झाली होती. त्यानंतर त्यांना तिरुचिरापल्ली येथील विशेष शिबिरात ठेवण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी रात्री श्रीलंकेला रवाना झाल्याचे समजते. तामिळनाडू सरकारने याआधी मद्रास उच्च न्यायालयाला सांगितले होते की, परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) हद्दपारीचे आदेश मिळाल्यानंतर ते श्रीलंकेत परत येऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेतून निवृत्त, 9 मंत्र्यांसह 54 खासदारांचा कार्यकाळ समाप्त

दरम्यान, श्रीलंकेच्या उच्चायुक्तालयाने या तिघांना त्यांच्या देशात परतण्यासाठी प्रवासी कागदपत्रे जारी केली होती. राजीव गांधी हत्या प्रकरणात आणखी एक श्रीलंकन नागरिक संथनचा मृत्यू झाला होता. याशिवाय राजीव गांधी हत्या प्रकरणात सुटलेले इतर लोक म्हणजेच पेरारिवलन, रविचंद्रन आणि नलिनी हे भारतीय नागरिक आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी या सातही दोषींना ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

कशी झाली होती माजी पंतप्रधान राजीव गांधींची हत्या?

21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान एका महिला आत्मघाती बॉम्बरने स्वत:ला स्फोट घडवून आणले होते. यामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू झाला होता. धनू असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी पेरारिवलन, मुरुगन, संथन, रविचंद्रन, रॉबर्ट पायस, जयकुमार आणि नलिनी श्रीहरन यांच्यासह अनेकांना आरोपी केले होते.


हेही वाचा – S. Jaishankar : मर्यादेत राहा, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालू नका; परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -