घरताज्या घडामोडीबिपीन रावत दुर्घटनेवर राजनाथ सिंहांची लोकसभेत महत्त्वाची माहिती, सारे स्तब्ध

बिपीन रावत दुर्घटनेवर राजनाथ सिंहांची लोकसभेत महत्त्वाची माहिती, सारे स्तब्ध

Subscribe

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घनेबाबत सविस्तर माहिती संसदेत दिली आहे. सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेचा घटनाक्रम सिंह यांनी संसदेत सांगितला आहे. सीडीएस बिपीन रावत वेलिंग्टनमध्ये सैनिक शाळेत जात होते यादरम्यान त्यांच्या हेलीकॉप्टरचा संपर्क तुटला असल्याचे राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले आहे. तसेच सीडीएस रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हेलीकॉप्टर दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून चौकशी सुरु केली असल्याचेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हणाले की, ८ डिसेंबर २०२१ च्या दुपारी सैन्याच्या हेलीकॉप्टरचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या अपघातामध्ये देशाचे पहिले तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत वेलिंग्टनमधील सैनिकी शाळेच्या कार्यक्रमासाठी जात होते. ११.४८ वाजता त्यांनी सुलूर ऐअरबेसवरुन उड्डाण घेतले. १२.१५ मिनिटांनी वेलिंग्टनमध्ये पोहोचायचे होते. १२.८ मिनिटांनी सुलूर एअरबेसचा हेलीकॉप्टरशी संपर्क तुटला. यानंतर कुन्नूरमध्ये काही लोकांनी जंगलात सैन्य दलाचे हेलीकॉप्टर जळताना पाहिले त्यामुळे लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर बचावकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जखमींना सैनिकी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.

- Advertisement -

या हेलीकॉप्टरमध्ये १४ लोक प्रवास करत होते. परंतु त्यांमधील १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. यांममध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा, हवालदार सत्पाल, ग्रुप कॅप्टन पी. एस. चौहान आणि स्क्वॉड्रन लीडर कुलदीप यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.


हेही वाचा : मी….. बिपीन रावत यांचे शेवटचे शब्द, बचावकर्त्याने सांगितला घटनाक्रम

- Advertisement -

सीडीएस बिपीन रावत यांच्या पार्थिवासह सर्व पार्थिव शरीरात सैन्य दलाच्या हेलीकॉप्टरने दिल्लीत आणण्यात येणार आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वेलिंग्टनच्या रुग्णालयात दाखल असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. एअर चीफ मार्शल व्हीर आर चौधरी यांना घटनास्थळी चौकशी करण्यासाठी बुधवारी पाठवण्यात आले आहे. त्यांनी या घटनेची पाहणी केली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय वायु सैन्यद्वारे एयर मार्शल मानिंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती वेलिंग्टनमध्ये पोहचली असून चौकशी सुरु केली आहे.

सीडीएस बिपीन रावत यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सैन्य दलाकडून सलामी देऊन करण्यात येणार आहे. तसेच इतर मृत अधिकाऱ्यांच्या पार्थिवावरही अंत्यसंस्कारही सैन्याच्या प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.


हेही वाचा : Bipin Rawat Chopper Crash: हेलीकॉप्टर्सच्या अपघातात घातपाताची शंका पंतप्रधानांच्या मनातही असेलच, मोदींनी खुलासा करण्याचे संजय राऊतांचे आवाहन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -