घर ताज्या घडामोडी राजपक्षे यांचा राजीनामा, २० जुलैला नवे राष्ट्रपती ठरणार; श्रीलंकेत आतापर्यंत काय काय...

राजपक्षे यांचा राजीनामा, २० जुलैला नवे राष्ट्रपती ठरणार; श्रीलंकेत आतापर्यंत काय काय घडलं पाहा!

Subscribe

दरम्यान, श्रीलंकेतील सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना परवानगीशिवाय २८ जुलैपर्यंत देश सोडून न जाण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे देशात खाद्य पदार्थांची कमतरता जाणवू लागली आहे. तर, औषधे, इंधनांचाही तुटवडा जाणवू लागला आहे. याविरोधात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीलंकेतून ते मालदीवला गेले होते. तेथून ते सिंगापूर येथे गेले. तेथून त्यांनी राजीनामा दिला. दरम्यान, आता २० जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींची नियुक्ती करण्यात येणार आहे. (Rajpakshe Resigns, new election on 20 july, see what happened in sri lanka till now)

हेही वाचाsri lanka crisis : आर्थिक संकटात श्रीलंका सरकार छापणार नवे चलन; कर्ज फेडीसाठी विकणार विमान कंपन्या

- Advertisement -

दरम्यान, श्रीलंकेतील सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांना परवानगीशिवाय २८ जुलैपर्यंत देश सोडून न जाण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीलंकेत आतापर्यंत काय काय घडलं?

- Advertisement -

३१ मार्च २०२२ – देशातील वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी गोटाबाया राजपक्षे यांच्या खाजगी निवासस्थानाकडे मोर्चा वळवला.

३ एप्रिल २०२२- गोटाबाया राजपक्षे यांनी मंत्रिमंडळ विसर्जित केले. यामुळे त्यांचे धाकटे बंधू बासिल राजपक्षे यांचंही अर्थमंत्रीपद गेलं, मात्र त्यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे पंतप्रधानपदावर कायम राहिले.

९ एप्रिल २०२२ – निदर्शने वाढली, राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते उपोषणाला बसले. राजकीय सुधारणांचा मार्ग मोकळा करण्यासाठी आंदोलक राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत होते.

९ मे २०२२ – राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी संसदेच्या अध्यक्षांना सांगितलं की ते पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.


१३ जुलै २०२२ – आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानावर धडक दिली. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, सर्वपक्षीय सरकार स्थापन व्हावे म्हणून त्यांना राजीनामा द्यायचा आहे. त्याच दिवशी गोटाबाया देशातून पळून गेले आणि राजीनामा न देता मालदीवमध्ये पोहोचले. त्यांनी 13 जुलै रोजी राजीनामा देण्याचे आश्वासन दिले होते.

१४ जुलै २०२२ – राष्ट्रपती गोटाबाया यांनी मालदिव सोडलं असून ते सिंगापूर येथे गेल्याची माहिती आज आली. सिंगापूर येथे पोहोचताच त्यांना पदाचा राजीनामा दिला. रानिल विक्रमसिंघे यांनी कार्यवाहू राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -