घरदेश-विदेशराजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनच्या नावात होणार बदल, देण्यात येणार 'हे' नाव

राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनच्या नावात होणार बदल, देण्यात येणार ‘हे’ नाव

Subscribe

नवी दिल्ली – दिल्लीच्या राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनला नवे नाव देण्यात आले आहे. आता त्याचे नाव ‘कर्तव्‍य पथ’ असे ठेवले जाईल. त्याच वेळी, राजपथच्या बाजूने सेंट्रल व्हिस्टा अव्हेन्यूमध्ये राज्यनिहाय खाद्यपदार्थांचे स्टॉल, चहूबाजूंनी हिरवेगार असलेले लाल ग्रेनाइट मार्ग,  वेंडिंग जोन, पार्किंग स्थळ आणि चोवीस तास सुरक्षा असेल. मात्र, लोकांना फक्त इंडिया गेटपासून मानसिंग रोडपर्यंत पार्क परिसरात खाद्य पदार्थ खाण्यास परवानगी नासेल. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतच्या संपूर्ण मार्गाचे 8 सप्टेंबर रोजी संध्याकाळी उद्घाटन करतील.

हा विभाग 20 महिन्यांनंतर लोकांसाठी खुला होईल. उद्घाटनाच्या दिवशी, अभ्यागतांना इंडिया गेटपासून मानसिंग रोडकडे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. मात्र, ते उर्वरित भाग वापरू शकतात. ९ सप्टेंबरपासून हा संपूर्ण विभाग सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने , प्रकल्पाची कार्यकारी एजन्सी, पाच व्हेंडिंग झोन स्थापन केले आहेत, जेथे 40 विक्रेत्यांना परवानगी दिली जाईल. पार्क परिसरात अन्य कोणाला त्यांच्या वस्तू विकण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -