घरदेश-विदेशकन्हैयालाल हत्याकांड, देशभरात संतापाची लाट, पोलिसांविरोधात नागरिक आक्रमक

कन्हैयालाल हत्याकांड, देशभरात संतापाची लाट, पोलिसांविरोधात नागरिक आक्रमक

Subscribe

कन्हैयालालच्या हत्याकांडामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजस्थानात पोलिसांविरोधात जनता आक्रमक झाली असून हल्लेखोरांना फासावर लटकवण्याची मागणी कन्हैयालालच्या कुटुंबीयांनी केली आहे.

राजस्थानमधील उदयपूर येथे मंगळवारी भरदिवसा कन्हैया लाल या टेलरची दुकानात घुसून निर्घुण हत्या करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्याने कन्हैया लालची हत्या करण्यात येत असल्याचे हल्लेखोरांनी व्हायरल व्हिडीओत सांगितले. कन्हैयालालच्या हत्याकांडामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. राजस्थानात पोलिसांविरोधात जनता आक्रमक झाली असून हल्लेखोरांना फासावर लटकवण्याची मागणी कन्हैयालालच्या कुटुंबीयांनी केली आहे.

कन्हैया लालच्या पोस्टमार्टेम अहवालात त्याच्या शरीरावर तलवारीचे २६ वार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.  तसेच त्याच्या गळ्यावर ८ ते १० वेळा तलवारीने वार करून तो चिरण्यात आला असून त्याचे शिर धडा वेगळे करण्यात आल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान कन्हैया लाल याच्यासोबत दुकानात काम करणाऱ्या प्रियांक नावाच्या कारागिराने पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानुसार ज्या पोस्ट मुळे हे हत्याकांड झाले ती पोस्ट कन्हैया लालने नाही तर त्याच्या आठ वर्षाच्या मुलाने शेअर केली होती. कन्हैया लाल स्वभावाने शांत होते. ते कधीही कोणाशीही वाद घालत नसतं. जेव्हा या पोस्टवरून खळबळ उडाली तेव्हा त्यांनी सगळ्यांची जाहीर माफीही मागितली पण तरीही काही समुदायाचे पुरुष आणि महिला दुकानात येऊन त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. यामुळे ते प्रचंड घाबरले होते. आपली हत्या केली जाईल याची त्यांना सतत भीती वाटायची. आणि शेवटी खरंच त्यांची हत्या झाली असे प्रियांकने सांगितले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दखल घेतली नाही

सोशल मीडियावर नुपूर शर्माचे समर्थन करणारी पोस्ट टाकल्यानंतर कन्हैया लालला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्याला सोडण्यात आले होते. पण तरीही त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. यामुळे तो प्रचंड घाबरला होता. त्याने पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

- Advertisement -

सरकारकडून कट्टरपंथी संघटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

दरम्यान या हत्याकांडावरून आता राजकारण सुरू झाले आहे. राजस्थानचे भाजप खासदार राज्यवर्धन सिंह राठौड यांनीही कन्हैया हत्याकांड ही घटना सामान्य घटना नसून दहशतवादी कारवाई असल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी त्यांनी राज्य सरकारवर ठपका ठेवला आहे. एका ठराविक समाजाप्रती राज्य सरकार नरमाईची भूमिका घेत असल्यानेच अशा घटना घडत आहेत. असा घणाघात राठौड यांनी केला असून जर सरकार यावर काहीच कारवाई करणार नसेल तर सरकारमधून बाहेर पडा असा टोला राठौड यांनी हाणला आहे. तसेच यावेळी राठौड यांनी राजस्थानमध्ये अशा अनेक कट्टरपंथी संघटना असून सरकार त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान कन्हैया लाल हत्याकांडाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, कन्हैया हत्याकांडाचा तपास एनआयकडे सोपवण्यात आल्याचे गृहमंत्री अमित शाह ायंनी टि्वट केले आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -