नवी दिल्ली : आपल्या रांगड्या शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित अससेले स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहल्यानंतरच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकुणच आपण चळवळीसाठी खर्च केलेले 30 वर्ष या मुलांचे यश पाहून सार्थकी लागल्याचेही ते म्हणाले आहेत.(Raju Shetty Deep Seeing the glorious journey of the sugarcane growers children they said-Spent youth)
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या राजु शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेत सध्या जरी काही कारणांनी चढ-उतार पहायला मिळत असले तरी आपण लढतच राहू असे म्हणणाऱ्या राजु शेट्टी यांचा राजकीय प्रवासही तेवढाच रंजक आहे. 2002 साली उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस आंदोलन करण्यात आलं. 1200 रुपये ऊस दर मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात शेट्टी जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी झाले आणि शेट्टी शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आले. 2003 मध्ये शेट्टी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर निवडून आले. असेच त्यांची काही आंदोलने महाराष्ट्रभर चर्चिले आहेत.
काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला “साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ?” मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार काल संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील
— Raju Shetti (@rajushetti) August 20, 2023
राजू शेट्टी यांची ती पोस्ट वाचा-
काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला “साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ?” मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार काल संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी गेलो. दारात सुंदर रांगोळी , फुलांचा सडा घालून केलेल्या औक्षणाने मन भारावून गेले. यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबीयांसोबत भाकरी, खर्डा, दही असा गावराण बेत असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. भरपेट जेवण आणि मनमोकळ्या संवादानंतर त्यांनी शाल व श्रीफळ देवून माझा कौटुंबिक सत्कार केला. या सत्कारावेळी त्यांनी माझ्या हातात ‘लोकसभा 2024’ साठी 25 हजार रूपयाचा धनादेश दिला.
हेही वाचा : देशातील शांतता भंग करण्याचा भाजपचा डाव; शरद पवारांचा घणाघात
अभिजीत पासाण्णांनी मानले आभार
आपल्या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी लिहले की, हा सगळा पाहूणचार करणारी व्यक्ती म्हणजे “अभिजीत पासाण्णा”. तो म्हणाला “साहेब आम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही उसाच्या आंदोलनातून 700 रुपयांचा दर 3000 रुपयांवर आणला नसता तर माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करता आले नसते आणि आज मी जिथं आहे तिथं स्वप्नात देखील पोहचू शकलो नसतो.” अभिजीतचे आयआयटी चेन्नई मधून इंजिनीअरिंगचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झाले, 8 वर्षे जनरल मोटर्स व पीएसए ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली. गेल्या तीन वर्षापासून तो दिल्ली गुडगांव येथील डायको या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरींगचा विभागप्रमुख म्हणून काम करत आहे. त्याचा भाऊ अमेरिकेत ‘मर्सिडीझ बेन्झ’ कंपनीमध्ये कार्यरत आहे.
हेही वाचा : उद्योगरत्न पुरस्कारांसाठी माणसातील ‘देव’माणसांची निवड-मुख्यमंत्री शिंदे
30 वर्ष सार्थकी लागली
एका सामान्य ऊस उत्पादकाच्या मुलांचा हा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी 30 वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना आज मनात दाटून आली.