घरताज्या घडामोडीRajya Sabha Election : लोकसभेसारखे राज्यसभेमध्येही भाजपकडून मुस्लिम चेहरा नसणार, जाणून घ्या...

Rajya Sabha Election : लोकसभेसारखे राज्यसभेमध्येही भाजपकडून मुस्लिम चेहरा नसणार, जाणून घ्या कारण

Subscribe

लोकसभेनंतर आता राज्यसभेत भाजपकडून कोणताही मुस्लिम चेहरा दिसणार नाही. भाजपकडून राज्यसभेवर तीन मुस्लिम चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. परंतु त्या तीन सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे. या सदस्यांना पुन्हा संधी देण्यात आली नाही. मुख्तार अब्बास नकवी (Mukhtar Abbas Naqvi), सैय्यद ज़फ़र इस्लाम और एम जे अकबर हे भाजपकडून मुस्लिम चेहरे देण्यात आले होते. यामधील कोणताही चेहरा पुन्हा राज्यसभेत दिसणार नाही.

राज्यसभेची निवडणूक येत्या १० जूनला होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून २२ उमदेवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. लोकसभेत भाजपकडून कोणताही मुस्लिम उमेदवार नाही. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ६ जणांना संधी दिली होती. परंतु त्यांचा पराभव झाला होता. एनडीएमध्ये केवळ १ मुस्लिम खासदार आहे. महबूब अली कैसर हे लोजपाच्या तिकिटावरुन जिंकले आहेत.

- Advertisement -

देशात १० जून रोजी १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक होत आहे. या सर्व जागांसाठीच्या सदस्यांचा कार्यकाळ जून ते ऑगस्ट दरम्यान संपणार आहे. त्याच वेळी, उमेदवारी अर्ज भारण्याची तारीख ३१ मे पर्यंत आहे. भाजप, काँग्रेस आदी पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्याचबरोबर यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना डावलण्यात आले आहे.

मुख्तार अब्बास नकवी यांचा राज्यसभेवरील कार्यकाळ ७ जुलैला संपणार आहे. मुख्तार अब्बास नकवी जर खासदार झाले नाही तर त्यांचं मत्रीपद जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

तर सैय्यद जफर इस्लाम यांचा कार्यकाळ ४ जुलै तर अकबर यांचा कार्यकाळ २९ जूनला समाप्त होणार आहे. राष्ट्रपतींच्या कोट्यातील काही जागा खाली आहेत. यामुळे काही मुस्लिम चेहऱ्यांना राष्ट्रपती नियुक्त खासदारकी मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : मी स्वत: पाहिलंय, हे संपूर्ण प्रकरण खोटंय, सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर केजरीवालांचं मोठं वक्तव्य

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -