राजस्थानमध्ये भाजपचा डाव फसला, BJP आमदाराचे काँग्रेसला मतदान तर कर्नाटकात क्रॉस व्होटिंग

राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुरजेवाला यांना तीन जागांसाठी उमेदवारी दिली आहे. तिघेही जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

Rajya Sabha Election

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये राजस्थानात भाजपचा डाव उलटा पडला आहे. भाजप आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेसच्या आमदाराला मतदान केलं आहे. तर कर्नाटकमध्येही भाजप आमदाराने आपलं मत काँग्रेसच्या उमेदवाराला दिलं आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय खेळी दाखवली आहे. भाजप आमदार शोभारानी कुशवाह यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केलं आहे. परंतु यानंतर शोभारानी यांचे मत नाकारण्यात आले आहे. याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही. अशा स्थितीत आता अपक्ष डॉ.सुभाष चंद्रा यांना निर्धारित मतांपेक्षा कमी मताधिक्य मिळण्याचे संकेत आहेत. घनश्याम तिवारी यांना जास्त मते मिळाल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. भाजपच्या एका आमदाराने आपल्या पसंतीच्या विरोधात जाऊन तिवारींना मत दिल्याची माहिती आहे. मतदानाच्या ट्रेंडनुसार काँग्रेसला ३ तर भाजपला जागा मिळेल असं दिसत आहे.

भाजप आमदाराने केलं क्रॉस व्होटिंग

राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजप आमादर शोभारानी कुशवाह आणि कौलाश चंद मीना यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. भाजप आमदाराने भाजप उमेदवार घनश्याम तिवारी आणि विरोधी उमेदवार सुभाष चंद्रा या दोघांच्या नावावर पेनाने बरोबर अशी खून केली आहे. असे मत नियमानुसार अवैध मानले जाते. या मतावर सुभाष चंद्रा यांनीसुद्धा आक्षेप घेतला आहे. ही प्रक्रिया निवडणुकीमध्ये योग्य मानली जात नाही. अशा प्रकारे मॉक पोलिंगमध्ये भाजपची ५ मते नाकारण्यात आले आहेत.

काँग्रेसचे तीन उमेदवार जिंकण्याची शक्यता

राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुरजेवाला यांना तीन जागांसाठी उमेदवारी दिली आहे. तिघेही जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंग

कर्नाटकमधून अशी माहिती समोर आली आहे की, मतदानादरम्यान जेडीएसचे आमदार श्रीनिवास गौडा यांनी क्रॉस व्होटिंग करून त्यांच्या पक्षाऐवजी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले. आमदार गौडा यांनीही काँग्रेसला मतदान केल्याचे उघडपणे सांगितले. दुसरीकडे, कर्नाटकात जेडीएसच्या आणखी एका आमदाराने क्रॉस व्होटिंग केल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा : महाविकास आघाडीला दणका! मलिकांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार