Rajya Sabha Polls: राज्यसभा निवडणुकीसाठी 15 राज्यांतील 57 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज, यूपीच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार

देशात राज्यसभेच्या 245 जागा आहेत. त्यापैकी सध्या भाजपचे 95 राज्यसभा सदस्य आहेत, तर काँग्रेसचे 29 राज्यसभा सदस्य आहेत. राज्यसभेत उत्तर प्रदेशचे सर्वाधिक 31 सदस्य आहेत, यापैकी 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे.

Rajya Sabha elections for 6 seats in Maharashtra announced polling will be held on 10th June

नवी दिल्लीः Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना आज जारी झाल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होणार आहे. 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. 31 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्याचवेळी उमेदवारी अर्जांची छाननी 1 जून रोजी होणार आहे. 3 जूनपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येणार आहेत. 10 जूनला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.

15 राज्यांतील 57 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून ते ऑगस्टदरम्यान संपत आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यात मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, काँग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल आणि अंबिका सोनी हे केंद्र सरकारमधील मंत्री आहेत. त्याचवेळी बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा कार्यकाळही संपत आहे. या सर्व राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्टदरम्यान संपत आहे.

यूपीमध्ये 11 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात

देशात राज्यसभेच्या 245 जागा आहेत. त्यापैकी सध्या भाजपचे 95 राज्यसभा सदस्य आहेत, तर काँग्रेसचे 29 राज्यसभा सदस्य आहेत. राज्यसभेत उत्तर प्रदेशचे सर्वाधिक 31 सदस्य आहेत, यापैकी 11 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 4 जुलै रोजी संपत आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या 6-6 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. बिहारमधील 5 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील राज्यसभेच्या 4-4 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे.

भाजपच्या राज्यसभा सदस्यांची संख्या कमी होणार?

मध्य प्रदेश आणि ओडिशातील प्रत्येकी तीन राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, पंजाब आणि हरियाणामधील प्रत्येकी दोन राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यावेळी राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राज्यसभा सदस्यांची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर येथील दोन्ही जागा ‘आप’चे उमेदवार काबीज करू शकतात. पंजाबमधील एकमेव अकाली दलाचे राज्यसभा सदस्य बलविंदर सिंग भूंदर आणि काँग्रेसच्या अंबिका सोनी यांचा कार्यकाळ संपणार आहे.

कोणत्या राज्यात, राज्यसभेच्या किती जागा निवडून येतात?

उत्तर प्रदेश 11
महाराष्ट्र 6
तामिळनाडू 6
आंध्र प्रदेश 4
बिहार 5
झारखंड 2
राजस्थान 4
पंजाब 2
हरियाणा 2
उत्तराखंड 1
कर्नाटक 4
ओडिशा 3
मध्य प्रदेश 3
तेलंगणा 2
छत्तीसगड 2


हेही वाचाः QUAD Summit 2022 : जपानी मुलाचे हिंदी ऐकून PM मोदी झाले अचंबित, विचारला ‘हा’ प्रश्न