Homeदेश-विदेशNo Confidence Motion : विरोधकांना धक्का; राज्यसभा सभापती धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव...

No Confidence Motion : विरोधकांना धक्का; राज्यसभा सभापती धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

Subscribe

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो प्रस्ताव आज फेटाळण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, उपसभापतींनी हा प्रस्ताव तांत्रिकतेच्या आधारावर फेटाळला आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. तो प्रस्ताव आज फेटाळण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, उपसभापतींनी हा प्रस्ताव तांत्रिकतेच्या आधारावर फेटाळला आहे. (rajya sabha vice president jagdeep dhankar no confidence motion rejected india alliance notice)

राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावर उपसभापती हरिवंश यांनी निर्णय दिला आहे. हा प्रस्ताव म्हणजे दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात केवळ नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांनी हा प्रस्ताव आणल्याचे सांगत उपसभापती हरिवंश यांनी हा प्रस्ताव फेटाळताना नियमांचे पालन न केल्याने देखील उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. या अविश्वास प्रस्तावाची नोटीस कमीत कमी 14 दिवस आधी जाणे गरजेचे असते. या नियमाचे पालन न झाल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा – Kharge On Amit Shah : शहांनी देवाची व्याख्याच बदलली…काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्यासंदर्भातील प्रस्तावावर गेल्या आठवड्यात राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू होते. या सततच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. तसेच स्वतः उपराष्ट्रपती धनखड यांनी आपल्याविरोधात नकारात्मक अभियान चालवल्याचा आरोप विरोधकांवर केला होता.

उपसभापती म्हणाले की, मी शेतकऱ्याचा मुलगाआहे आणि मी कधीही कमकुवत पडणार नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून मल्लिकार्जुन खर्गे आणि उपसभापतीं दरम्यान बराच वादही झाला होता. राज्यसभा सभापती जगदीप धनखड म्हणाले की, माझ्याविरोधात हा प्रस्ताव आणण्यात आल्याने मी दुःखी आहे. विरोधकांना माझ्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे. पण, माझ्याविरोधात अभियान म्हणून याचा वापर होऊ नये, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Coconut Oil : खोबरेल तेल खाण्यासाठी वापरावे की डोक्याला लावण्यासाठी? सुप्रीम कोर्ट म्हणते…


Edited by : Ashwini A. Bhatavdekar