घरताज्या घडामोडीPM Modi Security Lapse : हा शेतकऱ्यांचा रोष आहे का?, मोदींच्या सुरक्षेतील...

PM Modi Security Lapse : हा शेतकऱ्यांचा रोष आहे का?, मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीवर राकेश टिकैत यांचा सवाल

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राकेश टीकैत यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण घटनेमध्ये पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी झाली की शेतकऱ्यांनी हा रोष व्यक्त केलाय?, असे प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची राकेश टिकैत यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सुरक्षेतील त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा आक्रोश?

टीकैत यांनी बीकेयू संयुक्त शेतकरी मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे. केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या तीनही कायद्यांना केंद्र सरकारने गेल्या वर्षीच मागे घेतले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे रॅली रद्द केल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे रिकाम्या खुर्च्यांविषयी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं असून पंतप्रधान तिथून परतल्याचा दावा केला जात आहे. फिरोजपूरमधून मोदी पुन्हा परतले याचं मुळ कारण सुरक्षेतील त्रुटी आहे की शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, या संपूर्ण प्रकरणाची आणि घटनेची चौकशी होणं खूप महत्त्वाचं आहे, असं राकेश टिकैत म्हणाले.

- Advertisement -

हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ

पीएम मोदींच्या सुरक्षेमध्ये झालेल्या हलगर्जीपणाच्या सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत टीका केली आहे. तसेच हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ असून असं पुन्हा होऊ नये, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्याचसोबतच मोदींच्या ताफ्याला रोखणं हे चुकीचे असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. या प्रकरणावर आता आरोप-प्रत्यारोप सुरू असून यावरील सुनावणी पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवारी होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी देखील माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दुसरीकडे पंजाब सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. पंजाब सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्याचप्रमाणे ही समिती तीन दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : देशात सर्वात जास्त सदस्य नोंदणी महाराष्ट्रातून करू – नाना पटोले


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -