निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर शेतकरी मोठी घोषणा करणार, राकेश टिकैत यांचा इशारा

rakesh tikait warns after election code of conduct farmer will announce big decision
निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर शेतकरी मोठी घोषणा करणार, राकेश टिकैत यांचा इशारा

देशातील उत्तरेकडील राज्यांतील शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरुच ठेवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांनी काही मागण्यांसाठी आंदोलन सुरुच ठेवलं आहे. संयुक्त किसान मोर्चाकडून काही मागण्या केल्या आहेत. एमएसपी हमी कायदा आणि ७५० मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर देशात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर शेतकरी मोठी घोषणा करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत हैदराबाद येथे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, देशात पाच वर्ष असलेली सरकार शेतकऱ्यांना फक्त एकावेळीच कामाला येते. यांच्याकडून आता कुठे घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यावर आम्ही घोषणा करणार आहे की, आपल्याला काय करायचे आहे? असे राकेश टिकैत म्हणाले आहेत.

टिकैत यांनी कार्यक्रमादरम्यान पुढे म्हटलं आहे की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले परंतु आमच्यासोबत अद्याप चर्चा केली नाही. आम्ही काय शिक्षा भोगत असलेले आरोपी आहोत का? आमचे एकूण ७५० शेतकरी मृत्यू पावले आहेत. त्यांना मदतीची घोषणा कोण करणार? काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत? त्याच्यासह ते शेतकरी घरी जाणार का? असा सवाल करत आम्ही आंदोलन कसे संपवणार हे आता शेतकरी संघटना ठरवणार आहे. तसेच शेतकऱ्यांना एमएसपीची हमी असलेला कायदा पाहिजे असल्याचे राकेश टिकैत यांनी सांगितले.

टिकैत यांची असदुद्दीन ओवैसींवर टीका

हैदराबादमधील कार्यक्रमात संबोधित करत असताना राकेश टिकैत यांनी एआईएमआईएम राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर खोचक टीका केली आहे. ओवैसी भाजपची टीम असल्याचे राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे. असुद्दीन ओवैसी भाजपला मदत करत फिरत आहेत. त्यांना इथेच बांधून ठेवा, त्यांना बाहेर फिरू देऊ नका, ते बोलतात वेगळं परंतु त्यांचा उद्देश वेगळा असतो. असा घणाघात राकेश टिकैत यांनी केला आहे.


हेही वाचा : मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून काय चर्चा केली? राजनाथ सिंहांनी केला उलगडा