Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रक्षाबंधन २०२२: पीएम मोदी आणि सीएम योगींना मुस्लिम समाजातील महिलांनी पाठवली राखी

रक्षाबंधन २०२२: पीएम मोदी आणि सीएम योगींना मुस्लिम समाजातील महिलांनी पाठवली राखी

Subscribe

प्रयागराज – येथील सटे नैनी येथील कमर बानो यांच्यासह अनेक मुस्लिम समाजातील महिलांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली आहे. राखीसोबतच या महिलांनी दोघांनाही शुभेच्छा देऊन २०२४ च्या निवडणुकीत यश प्राप्त होण्याची प्रार्थना केली आहे. सर्व समाजाच्या हितासाठी भाजपाने पुन्हा सत्तेवर यावं असा शुभसंदेशात म्हटलं आहे. पाठवलेल्या राखींमध्ये आदित्यनाथ आणि मोदींचे छायाचित्र आहे. यावर मोदी राखी आणि योगी राखी असंही लिहिलं आहे. (Rakhi sent to PM Modi and CM Yogi by Muslim women)

हेही वाचा – कर्नाटकातील ‘या’ गावात नाही मुस्लिम कुटुंब, पण साजरा होतो मोहरम

- Advertisement -

कमर बानो यांना लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे. त्यांना पंतप्रधान कार्यालयातून भेटीसाठी फोनही आला होता. त्यामुळे त्यांनी रक्षाबंधनची पूर्ण तयारी केली आहे. राखीसोबतच पाठवलेल्या पत्रात त्यांनी मोदींच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली आहे. या क्षेत्रातील पप्पू सिद्दीकी, हरमन जीत सिंह, दलजीत कौर, अभिषेख मसीह, अरविंद जैन या अल्पसंख्यांक समाजातील लोकांनीही मोदींना पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – अंगारा देऊन मिरची बाबाने केला बलात्कार, महिलेच्या आरोपानंतर भोंदूला अटक

- Advertisement -

यावर प्रतिक्रिया देताना भाजप अल्पसंख्याक मोर्चा काशी क्षेत्रचे उपाध्यक्ष सरदार पतविंदर सिंह यांनी म्हटलंय की, अल्पसंख्याक समाजही मोदींना पसंत करतो. त्यामुळेच त्यांनी मोदींना राख्या पाठवल्या आहेत. त्यामुळे इतर समाजातील लोकांनीही मोदींप्रती सकारात्मक भावना व्यक्त करण्यासाठी राख्या पाठवाव्यात.

- Advertisment -