घरदेश-विदेशरामगोपाल यादवांचं 'ते' वक्तव्य घाणेरडं - योगी आदित्यनाथ

रामगोपाल यादवांचं ‘ते’ वक्तव्य घाणेरडं – योगी आदित्यनाथ

Subscribe

राम गोपाल यादव यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी देशाची माफी मागावी, असं वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

‘पुलवामातील हल्ला हा कट असून, मतांसाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे’, असं खळबळजनक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी केलं होतं. दरम्यान, ‘यादव यांचं हे वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण आहे’, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ‘पुलवामा हल्ल्याप्रकरणी यादव यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत घाणेरडं असून, हे घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण आहे. यादव यांनी हल्लामध्ये हौतात्म्य मिळालेल्या सीआरपीएफ जवानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे’, अशी प्रतिक्रिया योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तसंच ‘यादव यांनी देशाच्या जवानांचं मानसिक खच्चीकरण करणारं वक्तव्य केलं असून, देशाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणीही आदित्यनाथ यांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले यादव?

‘पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हा मतांसाठी घडवून आणलेला हल्ला होता. जवानांचा मोठा ताफा महामार्गावरुन जाण्यापूर्वी त्याची जम्मू-श्रीनगर दरम्यान तपासणी झाली नाही. जवानांना साध्या बसेसमधून पाठवणं हा एक पूर्वनियोजित कट होता. या सगळ्यामुळे सैनिक दलं सरकारवर नाराज आहेत’, असं वक्तव्य राम गोपाल यादव यांनी केलं आहे. ‘पुलवामा कटामध्ये नेमकं कोण सामील होतं, यावर मी अत्ता काही सांगणार नाही. मात्र, जेव्हा सरकार बदलेल तेव्हा याप्रकरणाशी निगडीत अनेक नेत्यांची पोलखोल होईल’, असंही यादव म्हणाले आहेत.

- Advertisement -

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन राजकीय वर्तुळात आधीच खळबळ माजलेली असताना, याप्रकरणामुळे पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -