Ayodhya Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन; युट्यूबवर भक्तिगीत व्हायरल

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा युट्यूबवर ही उत्साह.

Ayodhya

सर्वांचेच ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागून राहिले होते. तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, भक्तगण अयोध्येत पोहोचले असून अयोध्यानगरी सजली आहे. तसेच सर्वच रामभक्तांमध्ये हा उत्साह पाहिला मिळत आहेत. याशिवाय सोशल मीडियावर देखील राम मंदिर भूमिपूजनाचा माहौल पाहिला मिळत आहे. कारण युट्यूबवर एका ना अनेक भक्तिगीत लॉन्च करण्यात आली आहेत.

या गाण्यांमध्ये रामाची लीला, रामाच्या मंदिराची स्थापन आणि राम मंदिराचे भूमिपूजन अशा गोष्टींचे यातून वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये रवींद्र जैन यांचे गाणे अयोध्या करती है आव्हान हे सर्वात टॉप लिस्टला आहे. हे गाणे युट्यूबवर आतापर्यंत ४ करोड ५७ लाखहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. यासोबतच अक्षरा सिंह यांचे भोजपुरी गाणे देखील चांगलेच लोकप्रिय झाले आहे. यातील काही गाणी तुम्ही यानिमित्त पाहू शकता.

भोजपुरी अभिनेत्री आणि सिंगर अक्षरा सिंह एक सुंदर असे गाणे घेऊन आली आहे. त्या गाण्याचे बोल आहेत ‘स्वागत है श्री राम का’. हे गाणे खूपच लोकप्रिय असून हे गाणे मनोज मतलबी यांनी लिहिले आहे.


हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: भूमीपूजनाचा शुभ मुहूर्त केवळ ३२ सेकंदाचा! जाणून घ्या, विशेष कारण…