घरताज्या घडामोडीAyoddhya : हे गेल्या ३० वर्षांच्या मेहनतीचं फळ - मोहन भागवत

Ayoddhya : हे गेल्या ३० वर्षांच्या मेहनतीचं फळ – मोहन भागवत

Subscribe

अयोध्येमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी बोलताना ‘आजचा दिवस हे गेल्या ३० वर्षांचं फळ आहे’, असं ते म्हणाले.

‘अनेकजण या सोहळ्याला आज येऊ शकले नाहीत. लालकृष्ण आडवाणीजी आज घरी बसून हा कार्यक्रम पाहात असतील. संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी आवश्यक असलेल्या आत्मविश्वासाची आज सुरूवात झाली आहे. भारताची संपूर्ण जगाबाबत वागणूक वसुधैव कुटुंबकमची राहिली आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भारताची पद्धत आहे. असा सक्षम भारत उभा करण्याची आज सुरुवात झाली आहे. हे भारतातल्या लाखो मंदिरांमध्ये अजून एक मंदिर बनवण्याचं हे काम नाही. या मंदिरांचा आशय एकत्रपणे पुन्हा मांडण्याचं काम या मंदिर उभारणीतून होणार आहे, असं देखील मोहन भागवत यावेळी म्हणाले.

- Advertisement -

Ayoddhya Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्योत राम मंदिराचं भूमीपूजन थेट प्रक्षेपण!

Ayoddhya Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्योत राम मंदिराचं भूमीपूजन थेट प्रक्षेपण!

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, August 5, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -