घरताज्या घडामोडीराम मंदिर भ्रष्टाचार : माझी हत्या केली तरीही राम मंदिराच्या देणगीवर डल्ला...

राम मंदिर भ्रष्टाचार : माझी हत्या केली तरीही राम मंदिराच्या देणगीवर डल्ला मारु देणार नाही – संजय सिंह

Subscribe

देणगीवर डल्ला मारणे हा ११५ करोड हिंदुंचा आणि कोट्यावधी भाविकांचा आपमान

राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीनीमध्ये भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर करण्यात आला आहे. हा आरोप करणारे आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्याची माहिती संजय सिंह यांनी दिली असून माझा माझी हत्या केली तरीही राम मंदिराच्या देणगीवर डल्ला मारु देणार नाही असे खासदार संजय सिंह यांनी म्हटलं आहे. राममंदिराच्या जमीन खरेदीमध्ये १८.५ करोड रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. भाजपच्या गुंडांनी हल्ला केला असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

आपचे नेते संजय सिंह यांनी रविवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांच्यावर जमीन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. राम मंदिर परिसरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची किंमत २ करोड असून चंपत राय यांनी १८.५ करोड रुपयांना खरेदी केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्यामुळे सीबीआय आणि ईडीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी संजय सिंह यांनी केली आहे.

- Advertisement -

हत्या झाली तरीही चोरी करु देणार नाही

खासदार संजय सिंह यांनी त्यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. दिल्लीतील घरावर अज्ञात टोळक्यानं हल्ला केली आहे. या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ट्विट करत संजय सिंह यांनी इशारा दिला आहे. माझ्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. भाजप आणि त्यांच्या गुंडांनी कान उघडे ठेवून ऐकावे माझी हत्या करण्यात आली तरीही राम मंदिरासाठी आलेल्या देणगीवर डल्ला मारुन देणार नाही. असा इशारा खासदार संजय सिंह यांनी दिला आहे.

- Advertisement -

श्रीराम मंदिरासाठी आलेल्या देणगीची चोरी करत असाल तर एक नाही हजार वेळा आवाज उठवेल. देणगीवर डल्ला मारणे हा ११५ करोड हिंदुंचा आणि कोट्यावधी भाविकांचा आपमान आहे. यामुळे असंच होत राहिल्यास वारंवार आवाज उठवणार तसेच ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांना तुरुंगात टाकले पाहिजे असे संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

घोटाळ्यावर चंपत राय यांचे स्पष्टीकरण

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रचे सचिव आणि विश्व हिंदू परिषदचे नेते चंपत राय यांनी एक निवेदन जारी करत आरोप फेटाळले आहेत. चंपत राय यांनी म्हटले आहे की, भ्रष्टाचार आणि घोटाळ्याच्या आरोपांचे खंडन करत म्हटलं आहे की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने आतापर्यंत जेवढी जमीन खरेदी केल्या आहेत. त्या सर्व जमीनींची किंमत बाजारभावापेक्षा कमी आहे. केवळ राजनैतिक आणि राजकारण करण्याच्या दृष्टिने आरोप करण्यात येत असुन संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु आहे. असे चंपत राय यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -