अयोध्या : राम मंदिराचे उद्घाटन हे जानेवारी 2024मध्ये होणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. राम मंदिर सर्व सामान्यासाठी खुले झाल्यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीला हात लावता येणार नाही. अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. तर भाविकांना मंदिराच्या अंदाजे 35 फूट अंतरावरून दर्शन घेता येणार आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात फक्त राज आणि पुजाऱ्यांचा असतो, असे हिंदू धार्मिक मान्य आहे. या परंपरेनुसार, देशाचे पंतप्रधान आणि पुजारीच गाभाऱ्यात जाऊ शकतो, असा निर्णय मंदिराच्या ट्रस्टने सांगितला आहे.
राम मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा दिल्या जाती, अशी माहिती रामजन्मभूमीचे मुख्य आर्किटेक्ट आचार्य सत्येंद्र दास यांनी दिली आहे. तसेच पुजाऱ्यांच्या निवासाची आणि वैद्यकीय सुविधांबरोबरच निवास भत्ताही पुजारी आणि कर्मचार्यांना दिला जाणार आहे.
श्री राम जन्मभूमि मंदिर के प्रथम तल और परकोटा में चल रहा निर्माण कार्य
Construction activity on the first floor and periphery of Shri Ram Janmabhoomi Mandir. pic.twitter.com/sK0DPku2Uu
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) July 23, 2023
हेही वाचा – Jai Shree Ram: ‘या’ महिन्यात खुले होणार अयोध्येचं राम मंदिर
राम मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू
अयोध्येतील बाबरी मशिद-रामजन्मभूमींचा मुद्दा अनेक दशकांपासून देशातील राजकारणात केंद्रस्थानी राहिला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल दिला. यानंतर राम मंदिराचे निर्माण करण्यास सुरुवात झाली. मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास 1800 कोटी रुपयांचा खर्च येईल. राम मंदिराचे बांधकाम हे युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचा विश्वस्तांनी 2020 साली सप्टेंबर महिन्यांमध्ये दिली होती.