सूरत: काही दिवसांपूर्वीच वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केली गेली. त्यानंतर आता गुजरातच्या सुरतहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला लक्ष्य करण्यात येत आहे. रविवारी या ट्रेनवर दगडफेक झाली होती. ही ट्रेन रात्री आठ वाजता सुरतहून अयोध्येसाठी रवाना झाली. ही गाडी नंदुरबारला पोहोचताच रात्री पावणेअकराच्या सुमारास अचानक रेल्वेवर दगडफेक सुरू झाली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले आणि त्यांनी घाईघाईने ट्रेनच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करण्यास सुरुवात केली. असे असतानाही खूप दगड ट्रेनच्या आत पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. (Ram Mandir Even Aastha Special train to Ayodhya is not safe Stone pelting by social miscreants in Gujarat)
माहिती मिळताच, जीआरपी आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपासानंतर ट्रेन रवाना केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जीआरपीनुसार, आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री 8 वाजता सुरतहून अयोध्येसाठी रवाना झाली. या ट्रेनमध्ये एकूण 1340 प्रवासी होते. ट्रेनमधील प्रवासी जेवण करून भजने गाऊन झोपण्याच्या तयारीत होते. तोपर्यंत रात्रीचे साडेअकरा वाजले होते आणि ट्रेन नंदुरबारला पोहोचली. येथे गाडी थांबताच अचानक दगडफेक सुरू झाली.
अनेक बाजूंनी दगडफेक होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दगडफेक करणारी केवळ एक व्यक्ती नसून अनेक जण असल्याचा संशय आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी आपला बचाव सुरू केला. प्रवाशांनी घाईघाईने ट्रेनच्या खिडक्या आणि दरवाजे बंद केले, असे असतानाही कोचच्या आत अनेक दगड आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि काही वेळ चौकशी करून गाडी पुढे पाठवली.
जीआरपीकडून तपास सुरू
याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आल्याचे जीआरपीने सांगितले. 6 फेब्रुवारीला गुजरातमधून पहिली आस्था स्पेशल ट्रेन अयोध्येला रवाना झाली होती. या ट्रेनला मेहसाणा रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. गुजरातच्या अन्य स्थानकांवरून अशाच आणखी काही गाड्या लवकरच धावतील, असे त्यावेळी सांगण्यात आले. याच अनुषंगाने रविवारी सुरतहून आस्था स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.