घरदेश-विदेशRamdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून रामदेव बाबा यांनी स्वत: मागितली सुप्रीम...

Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीवरून रामदेव बाबा यांनी स्वत: मागितली सुप्रीम कोर्टाची माफी

Subscribe

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी पतंजली आयुर्वेदला सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फटकारले होते. तसेच रामदेव बाबा आणि कंपनीचे एमडी आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाने समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण दोघेही आज सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. यावेळी रामदेव बाबा यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, ते स्वत: न्यायालयात हजर झाले आहेत आणि ते माफी मागत आहेत. तुम्ही त्यांची माफी रेकॉर्डवर ठेवू शकता. (Ramdev Baba himself sought an apology from the Supreme Court over the misleading advertisement)

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : 2 कोटींच्या गाडीत फिरायचं अन्…; बच्चू कडूंची नवनीत राणांवर सडकून टीका

- Advertisement -

आज सुनावणीवेळी रामदेव बाबा यांच्या वकिलांनी म्हटले की, आम्ही या न्यायालयापासून पळून जात नाही. रामदेव बाबा स्वतः न्यायालयात हजर आहेत आणि न्यायालय त्यांचा माफीनामा नोंदवू शकतो. तसेच सुनावणीदरम्यान वकिलाने दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबाबत बोलताना सांगितले की, आमच्या मीडिया विभागाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नव्हती. त्यामुळे दिशाभूल अशी जाहिरात निघाली. मात्र न्यायमूर्ती अमानुल्ला आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने रामदेव बाबा यांच्या वकिलाच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, तुम्हाला याची माहिती नव्हती यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

न्यायमूर्ती अमानुल्ला म्हणाले की, बाबा रामदेव यांनी योगाच्या बाबतीत खूप चांगले काम केले आहे. पण ॲलोपॅथीच्या औषधांबाबत असे दावे करणे योग्य नाही. आयएमएच्या वकिलाने सांगितले की, रामदेव बाबा यांनी त्यांच्या औषधांची जाहिरात करावी, मात्र त्यांनी ॲलोपॅथी वैद्यकीय व्यवस्थेवर विनाकारण टीका करू नये. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी डोळे झाकून का ठेवले याचे आश्चर्य वाटत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर 1 कोटींचा दंड

दरम्यान, नोव्हेंबर 2023 मध्येच सर्वोच्च न्यायालयाने पतंजलीला दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या जाहिराती मागे घेण्याचे आदेश दिले होते आणि तसे न केल्यास कारवाई करू, असा इशाराही दिला होता. त्यामुळे आता पतंजलीच्या प्रत्येक चुकीच्या जाहिरातीवर 1 कोटी रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -