घरताज्या घडामोडी'तर आता जाईल २० कोटी लोकांची रोजीरोटी', तरी मोदीजी गप्प का?

‘तर आता जाईल २० कोटी लोकांची रोजीरोटी’, तरी मोदीजी गप्प का?

Subscribe

'आता १.७५ कोटी लघू उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अर्धे उद्योग जरी बंद झाले, तरी २० कोटीहून अधिक लोकांची रोजीरोटी जाईल', असे असून देखील मोदीजी गप्प का आहेत?

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. तर या कोरोना विषाणूमुळे आर्थिक घडी देखील विस्कळीत झाली आहे. अनेकांचे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. तर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आहे. तसेच देशातील १.७५ कोटी लघू उद्योग बंद होण्याच्या मार्गावर असून हे जर उद्योग बंद झालेत तर बेरोजगारीत आणखी भर पडणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, या मुद्यावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने सांगितले आहे की, ‘देशातील लघू उद्योग संकटात असून १.७५ कोटी लघू श्रेणीतील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा दिला आहे. या अहवालातील आकडेवारीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर सवाल केला आहे’.

- Advertisement -

मोदीजी गप्प का आहेत?

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले आहेत की, ‘आधी १२ कोटी नोकऱ्या गेल्या असून आता १.७५ कोटी लघू उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यातील अर्धे उद्योग जरी बंद झाले, तरी २० कोटीहून अधिक लोकांची रोजीरोटी जाईल’, असे असून देखील मोदीजी गप्प का आहेत? माध्यमातील सहकाऱ्यांनीही अभिनेत्रीतून वेळ मिळाला की, मोदी सरकारला देशाविषयी प्रश्न विचारवेत,’ असे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.’

- Advertisement -

असे होणे देशासाठी विनाशकारी ठरेल

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य केले आहे. केंद्र व राज्य सरकारांकडून कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कोणतीही मदत न मिळाल्याने देशभरात जवळपास २५ टक्के छोट्या व्यावसायिकांचे १.७५ कोटी लघू उद्योग बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे, असे होणे देशासाठी विनाशकारी ठरेल,’ असा इशारा कॅटने दिला आहे.


हेही वाचा – मोदी सरकारच्या निर्णयाचा पाकिस्तानला फायदा; पवारांनी व्यक्त केली चिंता


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -