Rape Case : रक्षकच झाले भक्षक, गँगरेपची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीसांचाच बलात्कार

Rape Case officer arrested for Rape of a girl who went to report a gangrape at police station
Rape Case : रक्षकच झाले भक्षक, गँगरेपची तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडितेवर पोलीसांचाच बलात्कार

उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. १३ वर्षीय पीडितेने पोलीस स्टेशनच्या एसएचओवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. यानंतर स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) टिळकधारी सरोजला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती. 13 वर्षीय तरुणीने आरोप केला आहे की, आधी 4 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर जेव्हा ती तक्रार घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा एसएचओने पोलीस ठाण्यातच तिच्यावर बलात्कार केला. पोलीस ठाण्यातील इतर सर्व पोलिसांना यापूर्वीच ड्युटीवरून हटवण्यात आले आहे. याप्रकरणी डीआयजी स्तरावर चौकशी सुरू असून त्यांना २४ तासांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

पीडितेने आरोप केल्यानंतर Rape Case : गँगरेपची तक्रार देण्यासाठी गेलेल्या मुलीवर पोलीस ठाण्यात बलात्कार, अधिकाऱ्याला अटक अशी माहिती ललितपूरच्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. पीडितेने या संपूर्ण घटनेची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली असून, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला, ते तिच्या एका नातेवाईकासोबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. तक्रार केल्यानंतर आरोपी एसएचओला अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन पीडित तरुणीला 22 एप्रिल रोजी चार तरुणांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पीडितेने न्याय मिळावा म्हणून पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र न्याय देण्याऐवजी तिला छळाचाच बळी व्हावे लागले. तिथे उपस्थित स्टेशन प्रमुख टिळकधारी सरोजनेही तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेने आपला त्रास एसपींना सांगितल्यानंतर कारवाई करण्यात आली.

ललितपूर पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांनी या प्रकरणात एसएचओ आणि इतरांविरुद्ध बलात्कार आणि POCSO कायद्यांतर्गत आरोप केले आहेत. ललितपूरचे एसपी निखिल पाठक यांनी सांगितले की, आम्ही एका आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करत आहोत. SHO निलंबित असून ते गुन्हेगार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पकडण्यासाठी पथके तयार केली होती. एका एनजीओने मुलीला त्यांच्या कार्यालयात नेले यानंतर या मुलीने सगळा प्रकार सांगितला आहे.


हेही वाचा : भारताची रशियाकडे तेलावर सवलत देण्याची मागणी; आगामी काळात तेल खरेदी होईल स्वस्त?