इंदौर : प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर सुटलेला धर्मगुरू आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी आसारामबापू इंदौरमधील आश्रमात प्रवचन देत असल्याची माहिती आहे. अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने आसारामबापूला जामीन मंजूर केला होता. तेव्हा, काही अटीही आरासारबापूला टाकण्यात आल्या होत्या. परंतु, आसारामबापूकडून सर्वोच्च न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे.
अल्पवयीने मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आसारामबापू हा अनेक वर्षापासून तुरुंगात आहे. प्रकृती खालावल्यामुळे आसारामबापूने जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने आसारामबापूला 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे. पण, जामीन मिळाल्यानंतर आसारामबापू इंदौरच्या आश्रमात प्रवचन देत असून समर्थकांना भेटत आहेत.
इंदौरच्या ज्या आश्रमात आसारामबापू प्रवचत देत आहे. त्याच आश्रमातून आसारामबापूला अटक करण्यात आली होती. जामीन मिळाल्यानंतर आसारामबापू पुन्हा त्याच आश्रमात परतला आहे. आश्रमाबाहेर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
स्थानिक मीडियाने माहितीनुसार, दररोज एक हजारांहून अधिक समर्थक आसारामबापूच्या प्रचवनासाठी आश्रमात येत आहेत. आश्रमात येण्यापूर्वी समर्थकांचे मोबाइल आणि स्मार्टवॉच काढून घेतले जात आहेत. आसारामबापूच्या एका प्रवचानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यासह काही दिवसांपूर्वी आसारामबापू रूग्णालयात तपासणीसाठी गेला होता. तेव्हा, समर्थकांनी त्याची आरती केली होती. याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.
सर्वोच्च न्यायालयाने आसारामबापूला जामीन देतान कोणालाही न भेटण्याची आणि प्रवचने न देण्याची अट टाकली होती. पण, आसारामबापूकडून अटींचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे.