घटस्फोटीत महिलेवर तो करायचा बलात्कार, ‘लग्न करूयात’ म्हटल्यावर केला खून!

या महिलेचा खून करण्याआधी तीच्यावर गँग रेप करण्यात आला. त्यानंतर गळा दाबून तीची आत्महत्या करण्यात आली.

Navi Mumbai : father kills son in turbhe area
वडिलांनी केली मुलाची हत्या

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घटस्फोटीत महिलेला एका तरूणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांनी लग्नाचे आश्वासन देत ४ वर्ष तिच्याशी शारीरीक संबंध ठेवला. अनेकवेळा तिच्याकडून ५० हजार रूपये उकळले. शेवटी त्या महिलेने निर्धार केला की जर त्या तरूणाने लग्न केले नाही तर त्याच्याकडून ५० हजार रूपये परत घ्यायचे. पण प्रियकराच्या मनता काहीतरी वेगळच होतं. प्रियकराने आपल्या मित्राच्याबरोबरने त्या महिलेची हत्या करण्याची योजना आखली.

या महिलेचा खून करण्याआधी तीच्यावर गँग रेप करण्यात आला. त्यानंतर गळा दाबून तीची आत्महत्या करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी त्या तरूणाला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. पाकुडिया (पाकुर) पोलीस स्टेशन परिसरांतर्गत सिदपूरमधील नाल्याजवळ ही घटना घडली. सिदपूर नाल्यात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मारेकऱ्याने गळ्यापासून शरीराचा अर्धा भाग कापला होता. पोलिसांना सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला असता अशी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबाकडे चौकशी केली असता, तीच्या प्रियकराबद्दल पोलिसांना समजले. पोलिसांनी आरोपी मोतीराम मरांडी याला अटक केली. पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवला असता प्रियकराने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी युवकाने पोलिसांना सांगितले की त्याने आपल्या साथीदार राजेश मुर्मू यांच्यासह अल्बिना टुडू नावाच्या महिलेची गळा आवळून खून केला.

आरोपी मोतीराम मरांडी यांनी पोलिसांना सांगितले की, चार वर्षांपूर्वी त्याने बाजारात अल्बिना टुडू नावाच्या महिलेची भेट झाली. येथूनच प्रेमाचा पहिला अध्याय सुरू झाला. त्यानंतर मोबाईल नंबरची देवाण घेवाण झाली. ते दोघेही नंतर लपून छपून भेटू लागले. त्यानंतर आरोपीने प्रेयसीकडून अनेकदा महिलेकडून ५० हजार रुपये घेतले. ४ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेम वाढलं. या युवकाने लग्नाचा बहाणा करुन महिलेवर ४ वर्ष लैंगिक अत्याचार केले. महिलेने जेव्हा लग्नाचा विषय काढला तेव्हा आरोपीने तीला मारण्याचा कट रचला.


हे ही वाचा – हातात नोकरी नाही, डोक्यावर छत नाही…हताश झालेल्या त्याने अखेर आत्महत्या केली!