घरताज्या घडामोडी...आधी रेप, माफी, लग्न नंतर लशीच्या बहाण्याने पत्नीला डोंगरावरून फेकलं

…आधी रेप, माफी, लग्न नंतर लशीच्या बहाण्याने पत्नीला डोंगरावरून फेकलं

Subscribe

उत्तराखंडमधील डाबडी जिल्ह्यात आरोपीने शिक्षेपासून बचाव व्हावा यासाठी  बलात्कार पीडितेबरोबर लग्न केलं. पण नंतर लस घेण्याच्या बहाण्याने तिला डोंगरावर नेऊन ढकलून दिलं. यात तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उत्तराखंडमधील डाबडी येथे राहणाऱ्या पीडित तरुणीचे शेजारी राहणाऱ्या तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. पण नंतर मात्र त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. यामुळे पीडितेने जुलै २०२० रोजी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली. मात्र यादरम्यान, आरोपीने मध्यस्थामार्फत पिडीतेशी संवाद साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला व तिची माफी मागितली. तसेच त्याने तिच्याशी लग्न करण्याचीही तयारी दर्शवली. यामुळे तरुणीनेही त्याला माफ केले. त्यानंतर तिने कोर्टात आरोपीवरील सर्व आरोप मागे घेत आपण त्याच्याशी लग्न करणार असल्याने खटला मागे घेत असल्याचे शपथ पत्र तिने दिले.  त्यानंतर कोर्टाने आरोपीची सुटका केली. नंतर ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी लग्नही केले.

- Advertisement -

पण दोघांमध्ये सतत खटके उडत. आरोपी तिला मारझोड करत असे तसेच उपाशीही ठेवत असे. यामुळे आरोपी पतीने पश्चातापातून नाही तर फक्त जेलमधून सुटका व्हावी यासाठी आपल्याशी लग्न केल्याचे तरुणीच्या लक्षात आले. यामुळे ती माहेरी निघून गेली. त्यावरून पुन्हा त्यांच्यात वाद झाला. ७ जून रोजी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी पीडीतेने त्याच्याविरोधात पुन्हा पोलीस तक्रार करण्याची धमकी दिली. यामुळे तिचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय आरोपी पतीने घेतला. नंतर त्याने तिची फोनवरून समजूत काढत घरी य़ेण्यास विनंती केली. त्यानंतर पीडिता घरी गेली. त्यावेळी कोरोना लस घेण्याच्या बहाण्याने तो तिला घेऊन डोंगरभागात गेला आणि त्याने तिला तिथून ढकलून दिले. यात पीडितेचा मृत्यू झाला. यादरम्यान,पीडितेची आई व भाऊ तिला फोन करत होते. पण तिचा फोन लागत नसल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केली. नंतर पोलीस तपासात आरोपीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -