सेवानिवृत्त सासरा, सुनेच्या डोक्यावर बंदूक ठेवून करायचा वारंवार बलात्कार!

raped

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी पोलिस स्टेशन परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका महिलेने आपल्या सेवानिवृत्त लेफ्टनंट सासरे राजेंद्रवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय सासरा आपल्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देतो ​​असा आरोपही या महिलेने केला आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की लग्नाच्या ४  महिन्यांनंतरच या गोष्टीला सुरूवात झाली. त्यानंतर आरोपीने माफी मागितल्या नंतर हे प्रकरण रद्द करण्यात आलं. या महिलेचा नवरा रावेंद्र हा एक अगदी साधा माणूस आहे. तो वडिलांना नेहमी घाबरत असे. त्यामुळे तो आपल्या वडिलांना काहीच बलोत नव्हता. त्यांना थांबवू शकत नव्हता. त्याचवेळी आजमगढ वरून पीडितेने बोलवले म्हणून तीचे आजोबा आले. याबाबत मंगळवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. जेणेकरून आरोपींना राजेंद्रला शिक्षा होऊ शकेल.

पीडितेचे म्हणणे आहे की, तिला सतत तिच्या सासरच्या लोकांनी धमकावले. घरात झोपयलाही दिलं जात नव्हतं. पंखासुद्धा बंद करून टाकायचे. माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून वारंवार माझ्यावर बलात्कार केला. पीडितेने सांगितले, “सासरच्यांनी माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला आणि सांगितले की आम्ही तुला पैसे देऊन विकत घेतले आहे. मी माझ्या पतीला याबद्दल बरेच वेळा सांगितले. परंतु त्याने माझे ऐकले नाही, तो मलाच नेहमी ओरडत असे .”

या घटनेविषयी बोलताना पोलीस म्हणाले की, या घटनेचा तपास सुरू आहे. दोषीवर तपासाच्या आधारावर कारवाई केली जाणार आहे. दोषी सेवानिवृत्त लेफ्टनंट असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जाईल.


हे ही वाचा – नाश्ता करायला उधारीवर घेतले ५ रुपये; नवाज-आलियाची केमिस्ट्री फुलली आणि..