घरCORONA UPDATEदेशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; रविवारच्या तुलनेत आज 46 टक्के रुग्ण अधिक

देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; रविवारच्या तुलनेत आज 46 टक्के रुग्ण अधिक

Subscribe

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 17,073 इतके नवे रूग्ण आढळले असून एका दिवसांत 21 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे

सध्या भारतात कोरोना पुन्हा आपली मान वर करू लागला आहे. दिवसेंदिवस पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी 27 जून रोजी भारतातील कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 17,073 इतके नवे रूग्ण आढळले असून एका दिवसांत 21 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच रविवारच्या तुलनेत 46 टक्के रूग्ण आज अधिक आढळले आहेत. तसेच गेल्या एका दिवसामध्ये 15,208 कोरना रूग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशातील सक्रिय रूग्णांची संख्या

- Advertisement -

भारतातील सक्रिय रूग्णांची संख्या 94 हजार 420 इतकी आहे, तर आत्तापर्यंतचे देशातील कोरोना रूग्णांची संख्या 4,34,07,046 वर जाऊन पोहोचली आहे. तसेत भारतात आत्तापर्यंत 5,25,020 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 4,27,87,606 कोरोना बाधीत रूग्ण बरे झाले आहेत. रविवाच्या तुलनेत आज कोरोना बाधित रूग्णांची 45% वाढ झाली आहे.

कोरोना बाधित बरे झालेले रूग्ण
आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आत्तापर्यंतच्या कोरोना रिकव्हरी रेट 98.57 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3,03,604 नमुना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात बीए व्हेरिएंटचे रूग्ण आढळले
सध्या राज्यात बीए व्हेरिएंटचे 4 व्हेरिएंटचे 3 रूग्ण आढळले तर व्हेरिएंटचे 5 व्हेरिएंटचे 2 रूग्ण आढळले आहेत. यामध्ये तीन पुरूष आणि २ स्रियांचा समावेश आहे. हे सर्व रूग्ण मुंबई येथील आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -