घरCORONA UPDATECorona: देशात ७ एप्रिलपासून रॅपिड टेस्ट होणार; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Corona: देशात ७ एप्रिलपासून रॅपिड टेस्ट होणार; आरोग्य मंत्रालयाची माहिती

Subscribe

देशात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ७९८ वर पोहोचली असून शनिवारी सर्वाधिक म्हणजचे ५६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद यात झाली आहे.

दिल्लीतील तबलीग जमात प्रकरण समोर आल्यापासून देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, आतापर्यंत देशात २७४ जिल्ह्यातून कोरोना रुग्ण वाढल्याची माहिती समोर येत आहे. पुढे ते म्हणाले की, तबलीग जमात प्रकरण झाले नसते तर, देशात ७.४ दिवसात कोरोनाचे केसेस दुप्पट झाले असते. मात्र आता ते ४.२ दिवसातच दुप्पट होत आहेत. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने येत्या ७ एप्रिलपासून देशभरात रॅपिट टेस्ट करण्याचे संकेत दिले आहेत. ही टेस्ट कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव ज्या परिसरात जास्त आढळून आला आहे, तिथे केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ‘Respect उद्धव ठाकरे’, मुख्यमंत्र्यांवर होतोय देशभरातून कौतुकाचा वर्षाव

- Advertisement -

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांची वाढ 

आरोग्य मंत्रालयाचे रविवारी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात ५५, आंध्र प्रदेश ३४, गुजरात १४, हिमाचल प्रदेश ७, राजस्थान ६, पंजाब आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी ३, कर्नाटक आणि ओडिसामध्ये प्रत्येकी २, तर झारखंडमध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ७९८ वर पोहोचली असून शनिवारी सर्वाधिक म्हणजचे ५६६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद यात झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले असून १४५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी covid19india.org या वेबसाइटच्या आधारे देण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यंत ७५ जणांचा मृत्यू झाला असून २१३ जण बरे झाले असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -