बाबो…कपाळावर बसवला रत्नजडित हिरा; रॅपर सिंगरचा विक्षिप्त शौक

लिल उजी वर्ट यांनी त्याच्या कपाळावर चक्क छिद्र पाडून त्यात हिरा बसवला आहे.

rapper from america has pierced the center of his head with diamond
बाबो...कपाळावर बसवला रत्नजडित हिरा; रॅपर सिंगरचा विक्षिप्त शौक

रॅप प्रकार सादर करणारे गायक फारच शौकिन असतात. त्यांचे राहणीमान आणि त्यांची फॅशन सर्वांनाचा आकर्षित करणारी असते. पण, त्यांचे हे शौक फारच विचित्र असतात. त्यातील एक कलाकार म्हणजे लिल उजी वर्ट. त्यांनी अत्युच्य आचरट लोकांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. लिल उजी वर्ट यांनी त्याच्या कपाळावर चक्क छिद्र पाडून त्यात हिरा लावून घेतला आहे. या हिऱ्याची किंमत तब्बल १७५ कोटी इतकी आहे.

कोण आहे लिल उजी वर्ट?

लिल उजी वर्ट याचे खरं नाव सायमर बायसिल वुड्स आहे. वुड्स हा त्याच्या चेहऱ्यावरील टॅटू आणि भयंकर हेअर स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, यापेक्षाही काहीतरी वेगळे करण्यासाठी त्यांनी आता एक नवीन स्टाईल केली आहे. त्यांनी आपल्या कपाळावर चक्क छिद्र पाडून त्यात रत्नजडित हिरा बसवला आहे.

काय म्हणाला वुड्स?

वुड्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘जो हिरा बसवला आहे त्याची किंमत फारच जास्त आहे. मी माझ्या घराची आणि गाड्यांची किंमत एकत्र केली तरी ती कमी पडेल. मी गेल्या २०१७ पासून हिऱ्यासाठी पैसे जमवत आहे. त्यामुळे यापुढे आयुष्यात इतकी महागडी वस्तू घेणार नाही. तसेच सौंदर्य फारच वेदनादायक असते. हा हिरा मी एलियट एलियनेट नावाच्या ज्वेलर्सकडून विकत घेतला आहे. तसेच हा अत्यंत दुर्मिळ हिरा आहे’.


हेही वाचा – PNB Scam: मेहुल चोक्सीला ED चा दणका; कोट्यावधींच्या मालमत्तेवर टाच