तुम्ही जगभरातील अनेक जंगली प्राणी पाहिले असतील. जे आपल्या खासियतेमुळे ओळखले जातात. मात्र अनेकदा असं काहीतरी पाहायला मिळतं. ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्ही एक क्षण देखील तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेऊ शकत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दुर्मीळ वाघ दिसून येत आहे. जो काळ्या रंगाचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून लोकांकडून त्याला पसंती देखील मिळत आहे.
व्हायरल होत असलेल्या हा व्हिडीओ ओडिसा टायगर रिजर्व येथील सांगण्यात येत आहे. जिथे खूप दुर्मीळ असा काळ्या रंगाचा वाघ दिसून आला आहे. तसेच त्याच्या अंगावर पिवळ्या पट्ट्या सुद्धा दिसून येत आहेत. या व्हिडीओतील हा वाघ तेथील एका झाडावर चढायचा प्रयत्न करत आहे.
Tigers are symbol of sustainability of India’s forests…
Sharing an interesting clip of a rare melanistic tiger marking its territory on international Tigers day.
From a Tiger Reserve poised for recovery of an isolated source population with a very unique gene pool. Kudos🙏🙏 pic.twitter.com/FiCIuO8Qj4— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 29, 2022
सोशल मीडियावर या व्हिडीओ आईएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर २९ जुलै रोजी शेअर केला आहे. ज्याला आत्तापर्यंत ३५ हजाराहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत.