घरट्रेंडिंगअजबच... या माशाला आहेत ३ ह्रदय आणि रक्ताचा रंग निळा आणि हिरवा!

अजबच… या माशाला आहेत ३ ह्रदय आणि रक्ताचा रंग निळा आणि हिरवा!

Subscribe

समुद्रात राहणाऱ्या अनेक जीवांपैकी हा सर्वात बुद्धिमान मासा

खोल समुद्रात राहणारा हा एक रहस्यमय प्राणी. या माशासारख्या दिसणाऱ्या जीवाला समुद्रात पाहणे फारच अवघड आहे. कारण हा मासा आपल्या शरीराचा रंग त्याच्या भोवती असणाऱ्या रंगाप्रमाणे बदलतो. या माशाला तीन हृदय असून त्याचे रक्त हे हिरव्या आणि निळ्या रंगाचे आहे. या माश्यावर कोणी हल्ला केला किंवा शत्रूला पाहून तो आपल्या चेहऱ्यामार्फत त्यावर धूर सोडतो, ज्यामुळे त्या शत्रूला अंधत्व येते. आंतरराष्ट्रीय बाजारात या माशाला सर्वाधिक मागणी आहे.

- Advertisement -

समुद्रात राहणाऱ्या अनेक जीवांपैकी पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांमध्ये हा सर्वात बुद्धिमान मासा आहे. कटलफिश (Cuttlefish) अर्थात समुद्रीफेनी म्हणून त्याला ओळखले जाते. या माशाला ऑक्टोपससारखे ८ हात असून याखेरीज त्याला लांब तंतू असतात. या तंतूमुळे त्यांना आपले समुद्रातील अन्न पकडणे सहज शक्य होते. या अनोख्या माशाच्या १२० प्रजाती समुद्रात जीवन जगत असतात. कटलफिशचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे कवच शरीराच्या बाहेरच्या बाजूस असते. त्याचे हे कवच पोकळ असल्याने आणि वेगळी शरीर रचना असल्याने खोल समुद्रात तो सहज ये-जा करू शकतो.

- Advertisement -

कटलफिशचे डोळे खूप मोठे असून डब्ल्यू-आकाराचे आहेत. त्याच्या या डोळ्यांच्या आकारामुळे तो १८० अंशांवर अस्तित्वात असलेला कोणताही जीव, परिसर पाहू शकते. आपल्या जीवांच्या आकारानुसार, आपले अन्न कोणते आहे किंवा कोण शिकार आहे, हे त्याला समजते. लहान मासे, खेकडे, कोळंबी वगैरे त्यांचे समान्य खाद्य असते.
कटलफिशच्या शरीरात तीन हृदय आहेत. ज्याद्वारे आपल्या शरीरात हिरव्या आणि निळ्या रक्ताचे प्रसारित तो करतो. त्याच्या शरीरात विशेष प्रकारचे प्रोटीन, कॉपर असल्याने त्याच्या शरीरातील रक्तामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो.

जसे माणसाच्या रक्तात लोह म्हणजे हिमोग्लोबिन असते. त्यामुळे मनुष्यांसह अनेक जीवांचे रक्त लाल रंगाचे असते. त्याच प्रकारे, कटलफिशमध्ये कॉपर प्रोटीन म्हणजेच हेमोसॅनिन असल्याने त्याच्या रक्ताचा रंग हिरवा आणि निळा असतो. शरीरातील तीन हृदयांपैकी, दोन ब्रैंकियल हृदय मेंदूत रक्त पोहोचवतो. तर तिसरे हृदय उर्वरित शरीरात हिरवं निळं रक्त पुरवत असते. कटलफिशला रक्तात कमी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याच्या शरीरात रक्ताचा प्रवाह देखील वेगवान असतो त्यामुळे त्याला तीन हृदय असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -