घरदेश-विदेशरश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती; सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णींचीही वर्णी

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती; सदानंद दाते, अतुलचंद्र कुलकर्णींचीही वर्णी

Subscribe

रश्मी शुक्ला ह्या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्या सध्या हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्या तेथे काम करत आहेत. 

नवी दिल्लीः फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. कॅबिनेट नियुक्ती समितीने(एसीसी) सन १९८८ व १९९९ बॅचच्या देशभरातील २० अधिकाऱ्यांना बढती दिली आहे. त्यात शुक्ला यांच्यासह अतुलचंद्र कुलकर्णी व सदानंद दाते यांनाही पोलीस महासंचालकपदी बढती मिळाली आहे.

दाते हे मुंबईतील कायदा व सुवस्था तसेच गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाखवलेल्या शौर्याबाबत दाते यांचा गौरवही करण्यात आला. ते तीन वर्षे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकही होते. मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisement -

अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत (एनआयए) कार्यरत आहेत. त्यांनी इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (आयबी) काम केले आहे. मुंबई गुन्हे शाखेत ते कार्यरत होते. ते महाराष्ट्र एटीएस व सीआयडी प्रमुखही होते.

रश्मी शुक्ला ह्या मार्च २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीत पुणे पोलीस आयुक्त होत्या. त्या सध्या हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून त्या तेथे काम करत आहेत.

- Advertisement -

राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळात काँग्रेसचे नेते नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, शिवसेना खासदार संजय राऊत, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप करण्यात आले होते. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा ठपका ठेवला होता.

यानंतर पुण्याच्या बंडगार्डन आणि मुंबईच्या कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, रश्मी शुक्ला केंद्राच्या प्रतिनियुक्तीवर हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून गेल्या. तरी याप्रकरणी पोलिसांनी त्यांना समन्स बजावून चौकशी केली. त्यामुळे शुक्ला यांच्यावर याप्रकरणी अटकेची टांगती तलवार होती. मात्र सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने त्यांना क्लिन चिट दिली. त्यानंतर याचा तपास बंद करण्यात आला. मात्र याचा नव्याने तपास करण्याचे आदेश पुणे न्यायालयाने गेल्या वर्षी पोलिसांना दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -