घरताज्या घडामोडीएअर इंडीयाच्या विमानात उंदीर, दिल्लीहून आली स्पेशल टीम, प्रवाशांचे पळा रे पळा

एअर इंडीयाच्या विमानात उंदीर, दिल्लीहून आली स्पेशल टीम, प्रवाशांचे पळा रे पळा

Subscribe

आर्थिक डबघाईस आलेली विमान कंपनी एअर इंडीया केंद्र सरकारने विक्रीला काढलेली असतानाच वाराणसीहून शनिवारी डेहराडूनला निघालेल्या विमानात एका उंदरामुळे प्रवाशांची पळा पळ झाल्याचे समोर आले आहे. या उंदरामुळे विमानच रद्द करावे लागले. पण क्रू मेबंर्सने २४ तास शोध घेऊनही उंदीर काही सापडला नाही. एवढेच नाही तर उंदराला शोधण्यासाठी दिल्लीहून पथक आले. पण त्यांनाही रिकाम्या हाताने परतावे लागले.

वाराणसीच्या लाल बहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडीयाचे विमान डेहराडूनला निघण्याच्या तयारीत होते. हे विमान कोलकाताहून वारणसीला आले होते. ३.५५ ला टेकऑफची वेळ असणाऱ्या या विमानाला आधीच विलंब झाला होता. विमान ५.२० ला विमानतळावर पोहचले. त्यामुळे प्रवासी आधीच वैतागले होते. केव्हा एकदा विमान टेक ऑफ करते याकडे प्रवाशांचे लक्ष होते. त्यानंतर काही वेळातच कॅप्टननेही विमान टेक ऑफ करण्यास तयार असल्याचे सूचित केले. यामुळे प्रवासीही तयार झाले. पण त्याचवेळी अचानक विमानात उंदीर असल्याचे एका प्रवाशाला दिसले. त्याने ते लगेच क्रू मेंबरला सांगितले. मग काय विमान उड्डाण थांबवण्यात आले. उंदराला शोधण्यासाठी सगळे क्रू मेंबर सज्ज झाले आणि विमानात शोध मोहिम सुरू झाली. पण प्रवासी मध्ये लुडबूड करत असल्याने क्रू मेंबर्सनी प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर विमान एप्रेनमध्ये नेण्यात आले. २४ तास ही शोध  मोहिम सुरू होती. पण उंदीर काही सापडला नाही. यामुळे रविवारी सकाळी उंदराला शोधण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम बोलावण्यात आली. पण तरीही उंदीर काही सापडला नाही. शेवटी उंदीर नाही असे समजून रात्री ८ वाजता विमान डेहराडूनला रवाना करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -