आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगताना रतन टाटा भावूक, म्हणाले माझी शेवटची वर्षे…

Ratan Tata got emotional during Talking about the last mission of his life
आयुष्यातील शेवटच्या मिशनबद्दल सांगताना रतन टाटा भावूक, म्हणाले माझी शेवटची वर्षे...

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. लोकांचे आवडते उद्योगपती म्हणूनही त्यांची ओळख आहे. कधी त्यांच्या कामामुळे तर कधी सामाजिक कामातील योगदानामुळे चर्चेच्या अग्रस्थानी असतात. परंतु आसाममध्ये भाषणादरम्यान रतन टाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर कमालीचे भावूक झाले. रतन टाटा यांनी त्यांच्या शेवटच्या मिशनबद्दल सांगितले. यावेळी त्यांच्या स्वरांचा उच्चार थरथरत होता तर बोलतानाही अडखळत बोलत होते.

उद्योगपती रतन टाटा आसाममध्ये ७ कर्करोग देखरेख रुग्णालयांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. कॅन्सरग्रस्तांच्या उपचारासाठी आसाममध्ये एकूण १७ रुग्णाये सुरु करणयाचा रतन टाटा यांचा मानस आहे. तसेच मुंबईतील कॅन्सर रुग्णालयांवर जास्त ताण येत असल्यामुळे टाटा यांनी असा निर्णय घेतला आहे.

रतन टाटा भावूक

रतन टाटा व्यासपीठावरुन संबोधित करताना म्हणाले की, मला हिंदीमध्ये भाषण देण्यास येत नाही त्यामुळे मी इंग्रजीमध्ये बोलेन, परंतु मी जे काही बोलेन ते ह्रदयापासून बोलेन, माझ्या आयुष्यातील शेवटची वर्षे मी आरोग्यासाठी समर्पित करत आहे. कॅन्सर रुग्णालयांच्या बाबतीत आसामला देशातील असे राज्य बनवा ज्याला सगळ्या ज्याची सर्व राज्यात ओळख असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सुद्धा टाटांच्या भूमिकेचे स्वागत केलं आहे.

नॉर्थ ईस्टमध्ये कॅन्सर मोठी समस्या

कर्करोग रुग्णालयांच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान मोदी संबोधित करताना म्हणाले की, कर्करोग ही केवळ आसाममध्येच नाही तर नॉर्थ ईस्टमध्ये मोठी समस्या आहे. आपल्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा सर्वाधिक फटका बसतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत येथील रुग्णांना कॅन्सरच्या उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते. त्यामुळे कॅन्सरग्रस्तांच्या कुटुंबांवर मोठा भार पडला. यावर मात करण्यासाठी गेल्या ५-६ वर्षांपासून राज्यात सुरु असलेल्या उपाययोजनांसाठी टाटा ट्रस्ट यांचे मोदींनी आभार मानले आहेत.


हेही वाचा : केंद्र सरकार ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म करणार लाँच; छोट्या-मोठ्या वस्तूंची करू शकता खरेदी