रतन टाटांचे भाऊसुद्धा सामान्य माणसाचे जीवन जगतात; लोक म्हणाले, टाटा तुस्सी ग्रेट हो..

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा हे देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. आपल्या साधेपणामुळे आणि दिलदारपणामुळे तो अनेकदा चर्चेत असतात. टाटा ट्रस्टचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अध्यक्ष सर रतन टाटा यांना एक भाऊ देखील आहे. या छोट्या भावाचे नाव जिमी टाटा असून ते रतन टाटा यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.मुंबईतील कुलाबा येथे एका साध्या फ्लॅटमध्ये राहतात याशिवाय हल्ली मोबाईल ही काळाची गरज असून, ते मोबाईलसुद्धा वापरत नाहीत.

Ratan Tata's brothers also live the life of a common man; People said, 'Tata Tussi great ho'
रतन टाटांचे भाऊसुद्धा सामान्य माणसाचे जीवन जगतात; लोक म्हणाले, टाटा तुस्सी ग्रेट हो..

टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा हे देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक आहेत. आपल्या साधेपणामुळे आणि दिलदारपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. टाटा ट्रस्टचे प्रसिद्ध उद्योगपती आणि अध्यक्ष सर रतन टाटा यांना एक भाऊ देखील आहे. या छोट्या भावाचे नाव जिमी टाटा असून, ते रतन टाटा यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. मुंबईतील कुलाबा येथे एका साध्या फ्लॅटमध्ये राहतात याशिवाय हल्ली मोबाईल ही काळाची गरज असून, ते मोबाईलसुद्धा वापरत नाहीत. ट्विटरवर उद्योगपती हर्ष गोएंका यांनी रतन टाटा यांचे भाऊ जिमी टाटा यांच्या राहणीमानाची आणि एकंदरीत त्यांची ओळख सांगितली आहे.

हर्ष गोएंका यांनी जिमी टाटाच्या मुंबईतील कुलाबा येथील 2 बीएचके फ्लॅटचा फोटो शेअर केला आहे. ते मुंबईतील कुलाबा येथे दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत असून, टाटा समूहासारख्या प्रसिद्धीपासून खूप दूर आहे. जिमीला व्यवसायात कधीच रस नव्हता,अशी माहिती हर्ष गोयंकाने दिली आहे. रतन टाटा यांच्या भावाच्या घराचा फोटो समोर आल्यानंतर ट्विटरवर लोक त्यांच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. हर्ष गोएंका यांच्या ट्विटला जवळपास 9 हजार युजर्सनी लाईक केले आहे आणि जवळपास हजारांनी रिट्विट केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, टाटा तुस्सी ग्रेट हो…,अशा अनेक कमेंट हर्ष गोयंका यांच्या ट्विट्ववर आल्या आहेत.

जिमी टाटा हा रतन टाटा यांचा धाकटा भाऊ असून, 90 च्या दशकात निवृत्त होण्यापूर्वी जिमी टाटा यांनी टाटाच्या विविध कंपन्यांमध्ये काम केले. जिमी टाटा कधीही मोबाईल ठेवत नसून त्यांना देश आणि जगाची माहिती वर्तमानपत्रातूनच मिळते.


हेही वाचा – भंडाऱ्यात काँग्रेस तर गोंदियात भाजप, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा