घरदेश-विदेशCovid-19: पुरी रथयात्रा यंदाही रद्द! सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांसह भाविकांविना काढण्यात येणार...

Covid-19: पुरी रथयात्रा यंदाही रद्द! सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांसह भाविकांविना काढण्यात येणार रथयात्रा

Subscribe

देशात कोरोना व्हायरसचा कहर अद्याप सुरू असून दिवसेंदिवस बाधितांची नोंद मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. या प्रादुर्भावादरम्यान, कोविडच्या दुसर्‍या लाटेचा विचार करता ओडिशा सरकारने भगवान जगन्नाथ यांचे मुख्य निवासस्थान असलेल्या पुरी वगळता राज्यातील सर्व ठिकाणी होणाऱ्या रथयात्रा उत्सवावर बंदी घातली आहे. ओडिशाचे विशेष मदत आयुक्त प्रदीप के जेना यांनी सांगितल्यानुसार, १२ जुलैपासून सुरू होणारी पुरी रथयात्रा भाविकांशिवाय केवळ सेवकांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचे कठोरपणे पालन यंदा देखील केले जाणार आहे.

- Advertisement -

तसेच ओडिशाचे विशेष मदत आयुक्त यांनी असेही म्हटले की, ओडिशा सरकारने नेहमीच लोकांच्या सुरक्षिततेला अत्यंत महत्त्व दिले आहे. ओडिसासह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा रथयात्रा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवात लोकसहभागदेखील मोठा असतो, या पार्श्वभूमीवर लोकसहभागवर बंदी घालणे आवश्यक आहे. कोविडचा निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या केवळ लसीकरण केलेल्या सेवकांना रथयात्रा विधींमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली जाणार आहे.

दरम्यान, १८ जून २०२० रोजी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने खबरदारी म्हणून रथयात्रेवर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने कर्फ्यूसह ११ मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यावेळी ओडिशा सरकारने असे सांगितले होते, सार्वजनिक स्वरूपात आणि भाविकांच्या उपस्थितीशिवाय ही रथयात्रा आयोजित करणे शक्य आहे, त्यानंतर कोर्टाने रथयात्रा काढण्याचा मार्ग मोकळा केला होता. पुरी आणि राज्य सरकारमधील प्रवेश रस्ते बंद ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानंतर गेल्यावर्षी देखील भाविकांच्या उपस्थितीशिवाय रथयात्रा काढण्यात आली होती.


मविआ सरकार नुसतं ५ वर्ष टिकणार नाही तर लोकांसाठी काम करणार, शरद पवार यांचे आश्वासन

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -