Ration Card: तुमचं नाव रेशन कार्डमधून वगळलंय?, नाव शोधण्याच्या सोप्या टिप्स

भारतात आजही रेशन कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. हा एक महत्त्वाचा पुरावा किंवा कागदपत्र आहे. ज्याचा वापर आपण बँकेपासून ते अनेक कामापर्यंत करतो. केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड धारकांना अनेक सोई-सुविधा उपलब्ध करून देतात. हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. ज्यामुळे गरीब लोकांना सहजतेने सरकारी योजनेत सब्सिडीवालं रेशन मिळतं. यामध्ये तांदूळ, दाळ, गहू , रॉकेल आणि इतर सेवा कमी किंमतीत उपलब्ध होतात.

कोरोना महामारीच्या काळात रेशन कार्डच्या मदतीने जवळपास ८० कोटी लोकांना सरकारने फ्रीमध्ये रेशन वाटप केलं आहे. त्याचसोबतच रेशन कार्ड आयडी प्रूफ आणि पत्ता ओळखण्यासाठी खूप महत्त्वाचं साधन आहे.

रेशन कार्डमुळे मोठी मदत

रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही मोफत धान्याचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठीही रेशन कार्डचा मोठा फायदा होतो. तुम्ही एलपीजी कनेक्शन, लँडलाईन नंबर, नवीन सीम, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे बनवू शकता.

१० मिनिटांत अशी करा तपासणी

रेशन कार्डच्या यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्ही त्याची अधिकृत वेबसाईट https://nfsa.gov.in/Default.aspx वर जाऊन भेट देऊ शकता. 

– पहिल्यांदा रेशन कार्डचा पर्याय निवडा.

– त्यानंतर रेशन कार्ड डिटेल्स ऑन स्टेट पोर्टल्सच्या पर्यायावर क्लिक करा.

– क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्याचे आणि जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करावे लागेल.

– त्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉक आणि पंचायतीचा पर्याय देखील निवडावा लागेल.

– हा पर्याय निवडल्यानंतर तुमच्यासमोर रेशनकार्डधारकांची यादी उघडेल.

– यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.

दरम्यान, रेशन कार्डच्या यादीत जर तुमच्या नावाची नोंदणी नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे वरील दिलेल्या टीप्स आणि पर्यायानुसार तुम्ही आपले नाव रेशन कार्डच्या यादीत आहे की नाही, हे चेक करू शकता.


हेही वाचा : ST workers Strike : एसटी कर्मचारी निलंबनाच्या कारवाईवर अनिल परबांचे महत्वाचे विधान, म्हणाले कारवाई झाली त्यांचे…