Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्राकडून नियमात मोठे बदल, जाणून घ्या

रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल अनेक राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांमध्ये करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार, केरळ, उत्तरप्रदेश या तीन राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाहीये. या व्यतिरिक्त दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे.

मे ते सप्टेंबरपर्यंत सर्व ३६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी गहू आणि तांदळाच्या वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं केंद्राने राज्यांना म्हटलं आहे. तसेच गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून केली जाणार असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटलं आहे.


हेही वाचा : पुण्याचे वैभव बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास कलाकारांच विरोध