Homeदेश-विदेशRaut On Advani : "अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी...", संजय राऊतांची खंत

Raut On Advani : “अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी…”, संजय राऊतांची खंत

Subscribe

'कोणी धमक्या देत असले, फुसके बार सोडत असेल, तर ही शिवसेना बोगस नाही', असा इशाराही संजय राऊत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना दिला आहे.

मुंबई : केंद्र सरकारने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरकार जाहीर केला आहे. अडवाणी नसते आणि राम रथयात्रा सुरू केली नसता, तर आजचा भाजपा तुम्हाला दिसला नसता. अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी द्यायला हवा होता, अशी खंत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, अशा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी दिला होता.  ‘कोणी धमक्या देत असले, फुसके बार सोडत असेल, तर ही शिवसेना बोगस नाही’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिला आहे.

सरकारने लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न दिले आहे? यावर संजय राऊत म्हणाले, “अडवाणी नसते आणि राम रथयात्रा सुरू केली नसता, तर आजची भाजपा तुम्हाला दिसली नसती. दोन खासदारांवर असलेला भाजपा आज 300पार झाला तो अडवाणींमुळे. अडवाणींनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखण केली. ‘अब की बार अटल बिहारी’ अशी घोषणा त्यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान होण्याची अडवाणींची योग्यता आणि अधिकार असताना सुद्धा त्यांना भाजपाने दूर सारले आणि अडवाणींना इतके अडगळीत टाकले गेले की, अडवाणींना लोक विसरून गेले. मग त्यांना कधी पद्मविभूषण किंवा आता भारतरत्न द्या, आज अडवाणींचे वय 97 वर्ष आहे. अडवाणींना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी द्यायला हवा होता. गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदाची तुम्ही निवड पाहता लालकृष्ण अडवाणी हे देशाच्या राजकारणातील भीष्म पुरुष आहे. त्यांना सन्मानाने राष्ट्रपती पदी द्यायला हवे होते. पण तसे भाजपाने केले नाही. पण आता अडवाणींना भारतरत्न दिले आहे, आम्हाला आनंद आहे आणि आम्ही त्यांचे स्वागत करतोय.”

हेही वाचा – Raut On Bhujbal : “भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार…”, संजय राऊतांची मुख्यमंत्री आणि फडणवीसांवर टीका

शिवसेना बोगस नाही

आज उद्धव ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होणार आहे. या सभेला भाजपाने विरोध केला असून निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, अशा इशारा दिला आहे. यावर संजय राऊत म्हणाले, “कोणी धमक्या देत असले, फुसके बार सोडत असेल, तर ही शिवसेना बोगस नाही. उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणची जनता उद्धव ठाकरेंची प्रतिक्षा करत आहे. उद्धव ठाकरेंच्या दौरा हा ठरलेल्याप्रमाण होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी कोकणवासीयांनी केली आहे. लवकरच उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.